स्थानिक

जळगाव सुपे येथे ‘कृषि दिन-कृषि संजीवणी’ मोहिमेचा समारोप 

चांगले यश मिळवलेल्या 12 शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले

जळगाव सुपे येथे ‘कृषि दिन-कृषि संजीवणी’ मोहिमेचा समारोप 

चांगले यश मिळवलेल्या 12 शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्र्‍ शासन कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र, बारामती व पंचायत समिती बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जुलै 2021 रोजी मौजे जळगाव सुपे येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ‘कृषि दिन-कृषि संजीवणी’ सप्ताहाचा समारोप  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, तालुका कृषि अधिकारी दतात्रय पडवळ, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ रतन जाधव, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष गोडसे, पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकरी भानुदास साळवे, जळगाव सुपेचे माजी सरपंच लक्ष्मण जगताप, ग्रामपंचायत सदस्या सूनब्बी मुजावर, पंचायत समितीचे कृषि अधिकारी संजय जगताप, कृषि पर्यवेक्षक प्रतापसिंह शिंदे, आत्मा बारामतीचे बीटीएम विश्वजित मगर, एटीएम गणेश जाधव, जळगाव सुपेचे ग्रामसेवक गणेश लडकत, कृषि सहायक निरंजन घोडके यांसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

बारामती तालुक्यात 21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषि संजीवनी मोहिमेचे आयोजन गावोगावी करण्यात आले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ रतन जाधव यांनी यावेळी शेतकरी बांधवांना विविध शेती उपयोगी विषयांवर मार्गदर्शन केले. त्याच बरोबर कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष गोडसे यांनी  विविध फळझाडांची लागवड व व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर 100 शेतकरी बांधवांना मान्यवरांच्या हस्ते फळझाडांचे वाटप करण्यात आले.

यावेळी बारामती तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी कृषि विषयी केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती  दिली तसेच  तेलबीया लागवडीस असलेला वाव लक्षात घेता तेलबीया एरंड, सूर्यफूल, भुईमूग, सोयाबीन इत्यादी पिकांची लागवड कशी करावी याबाबतही त्यांनी  माहिती दिली. यावेळी कृषि दिनाचे औचित्य साधून सन 2020-21 अंतर्गत रब्बी हंगामात राबविण्यात आलेल्या ज्वारी व हरभरा पीक स्पर्धेत जिल्हा व तालुका पातळीवर  चांगले यश मिळवलेल्या 12 शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले. विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे- जिल्हास्तर,  पीक- हरभरा प्रथम क्रमांक छाया तानाजी पवार,  मौजे कुरणेवाडी, व्दितीय क्रमांक पांडुरंग नारायण कोकरे, मौजे धुमाळवाडी, तृतीय क्रमांक राजे्ंद्र दादासो पोमणे, मौजे माळवाडी लोणी, पीक-ज्वारी, प्रथम क्रमांक अशोक पाटील तावरे, मौजे माळेगाव खु., व्दितीय क्रमांक भाऊसाहेब आनंदराव बागल, मौजे उंडवडी क.प., तृतीय क्रमांक हेमंत प्रतापराव भगत, मौजे ढाकाळे,  तालुकस्तरीय विजेत्या स्पर्धकांची नावे  पीक- हरभरा, प्रथम क्रमांक संजय रामचंद्र खोरे, मौजे बाबुर्डी, व्दितीय क्रमांक मोहन  सर्जेराव सकुंटे, मौजे वाघळवाडी, तृतीय क्रमांक हरिश्चंद्र जगन्नाथ गायकवाड, मौजे माळेगाव बु., पीक- ज्वारी, प्रथम क्रमांक बापूराव आनंदराव बागल, मौजे उंडवडी क.प., व्दितीय क्रमांक मनिषा युवराज जराड, मौजे उंडवडी क.प., तृतीय क्रमांक पुष्पा संभाजी चौधरी,  मौजे, वढाणे. यावेळी पंचायत समितीच्या सभापती  नीता फरांदे यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करुन इतर शेतक-यांना खरीप हंगामात जास्तीत जास्त सहभाग घेणेसाठी आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!