मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था व कोरोनाचे कारण देत बारामती पोलिसांनी ओबीसी एल्गार मोर्चाला परवानगी नाकारली
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या केल्या सूचना
मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था व कोरोनाचे कारण देत बारामती पोलिसांनी ओबीसी एल्गार मोर्चाला परवानगी नाकारली
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या केल्या सूचना
बारामती वार्तापत्र
बारामतीमध्ये 29 जुलै रोजी शहरांमध्ये ओबीसी एल्गार महामोर्चा होणार असल्याचे आरक्षण कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर कोविड चे रुग्ण आढळत असल्याच्या कारणावरून शहर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी २९ जुलै रोजी बारामती येथे सर्वच ओबीसी बांधवांनी एकत्र येत एल्गार महा मोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी चालू आहे.या मोर्चाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे पालवे, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. बारामतीतील ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाने या सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत यांना मोर्चाला उपस्थित राहण्याबाबत आमंत्रणही दिले होते. त्यांनीही सदर मोर्चाला उपस्थित राहण्याबद्दल अनुकुलता दर्शवली होती. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात शिष्टमंडळाने गावोगावी भेट देत चोख नियोजन केले आहे. मात्र मोर्चा आठ दिवसांवर आला असताना बारामती पोलिसांनी एक नोटीस काढत सदर मोर्चाला परवानगी नाकारली आहे. बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मोर्चाच्या आयोजनामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव आहे.
मोर्चाच्या आयोजनामुळे कोरोना रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामती पोलिसांनी मोर्चेकरयांना मोर्चा काढण्यात ऐवजी आपले म्हणणे कायदेशीर मार्गाने मांडण्याचा सल्ला देत या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तशा प्रकारची नोटीस बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जारी केली आहे. त्यामुळे या हा एल्गार महामोर्चा होणार का? पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली असताना या मोर्चाला मंत्री उपस्थित राहणार का? ओबीसी बांधव या नोटीस विरोधात काय भूमिका घेणार याकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.