1947 मध्ये काय घडलं हे कोणी सांगितलं तर आपण पद्मश्री पुरस्कार परत करू,? स्वातंत्र्याच्या विधानानंतर कंगनाचा नवा सवाल
आता यापुढे या वादाला कोणतं वळण मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
1947 मध्ये काय घडलं हे कोणी सांगितलं तर आपण पद्मश्री पुरस्कार परत करू,? स्वातंत्र्याच्या विधानानंतर कंगनाचा नवा सवाल
आता यापुढे या वादाला कोणतं वळण मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
प्रतिनिधी
1947 मध्ये काय घडलं हे कोणी सांगितलं तर आपण पद्मश्री पुरस्कार परत करू, असं तिनं म्हटलं आहे.
अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यामुळे अडचणीत सापडत असते. अलीकडेच तिने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर जोरदार टीका होत असून, तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणी केली जात आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं भाजप सरकार सत्तेत आल्यावर भारताला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं आहे. 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक मागून मिळालं होतं,’ असं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने एका मुलाखतीत केलं होतं. त्यावरून तिच्यावर सर्व स्तरांतून जोरदार टीका होत आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला असून, आम आदमी पार्टीने कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे. भाजप खासदार वरुण गांधी यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर टीका करत त्याची तुलना देशद्रोहाशी केली आहे. नुकताच तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा अशी मागणीही आता जोर धरत आहे.
त्यामुळे आपल्या या विधानावर कंगनाने पुन्हा इन्स्टाग्राम स्टोरीवर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘या मुलाखतीत सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगण्यात आल्या होत्या. स्वातंत्र्यासाठीचं पहिले संघटित युद्ध 1857 मध्ये लढलं गेलं होतं. सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांच्या बलिदानाबद्दलदेखील मी बोलले. मला 1857 ची माहिती आहे; पण 1947 मध्ये कोणती लढाई लढली गेली हे माहीत नाही. याबाबत कोणी मला अधिक माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन… कृपया मला मदत करा,’ असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कंगनाने पुढे लिहिलं आहे, की ‘मी राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या महान व्यक्तीवरच्या चित्रपटात काम केलं आहे. त्यानिमित्त 1857च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यावर बराच अभ्यास केला आहे. राष्ट्रवादाबरोबरच उजव्या विचारसरणीचाही उदय झाला; पण तो अचानक कसा संपला? आणि गांधींनी भगतसिंग यांना का मरू दिलं? शेवटी नेताजी बोस यांची हत्या का झाली? त्यांना गांधीजींचा पाठिंबा कधीच का मिळाला नाही? शेवटी, इंग्रजांना फाळणी करण्यास परवानगी का देण्यात आली? स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी भारतीय नागरिक एकमेकांना मारत होते, असे अनेक प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मला हवी आहेत.’