शैक्षणिक

2 मार्चपासून नर्सरी, छोटा गट व मोठ्या गटा चे वर्ग सुरू होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कुठलाही पुरस्कार हा गुणवत्तेवर दिला गेला पाहिजे, मी बारामतीचा आहे म्हणून तेथील शिक्षकांना गुणवत्ता नसेल तर द्यायचं नाही .

2 मार्चपासून नर्सरी, छोटा गट व मोठ्या गटा चे वर्ग सुरू होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कुठलाही पुरस्कार हा गुणवत्तेवर दिला गेला पाहिजे, मी बारामतीचा आहे म्हणून तेथील शिक्षकांना गुणवत्ता नसेल तर द्यायचं नाही .

पुणे –प्रतिनिधी

कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षणास सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्ष शिक्षणाप्रमाणे ऑनलाईन शिकवता येत नसल्याची खंत उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केली आहे.ऑनलाईन शाळेमुळे विद्यार्थी शाळेत जाणे विसरून गेले आहेत. त्यांना पुन्हा शाळेची गोडी लावणे आवश्यक आहे.

कोरोना रूग्णांमध्ये कमी होणारी रूग्णसंख्या पाहाता शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे बालवाडीपासून 12 पर्यंतचे वर्ग जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळा 2 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पालकांना वाटलं तर त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

2 मार्चपासून नर्सरी, छोटा वर्ग सुरु होणार

येत्या 2 मार्चपासून नर्सरी, छोटा गट व मोठ्या गटा चे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षणास सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्ष शिक्षणाप्रमाणे ऑनलाईन शिकवता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.ऑनलाईन शाळेमुळे विद्यार्थी शाळेत जाणे विसरून गेले आहेत. त्यांना पुन्हा शाळेची गोडी लावणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकांना शनिवार आणि रविवारी ही वर्ग घ्यावेत. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी लातूर पॅटर्न राबवाव लागणारअसेही ते म्हणाले आहेत. कोरोना काळात तुम्हांला घरी बसवून पगार देत होतो, काही जण काम करत होते मात्र काही जण दांडी मारत होते.

शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे

माझ्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला असता तर चांगलं झालं असत. मला मुलांचाही सत्कार केला जाणार आहे असे, सांगितलं गेलं. मी आलो तेंव्हापासून पाहतो, येथे केवळ शिक्षक आहेत. नंतर कधी सत्कार करणार तुमचा कार्यकाळ 21 मार्चला संपणार आहे. असे विचारात आयोजकांची फिरकीही त्यांनी घेतली. जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या नसतात असा समज झाला होता, परंतु, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि पदाधिकारी यांनी लक्ष घातले आहे, त्यामुळे पट वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या शिक्षकांचे मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत नाहीत, जो पर्यत आम्ही गुणवत्ता सुधारणार नाही, तोपर्यत आम्ही पालकांना कसं सांगणार.  तुमचे मुले पाठवा म्हणून असा टोलाही त्यांनी शिक्षकांना लगावला आहे. विज्ञानाची कास धरली पाहिजे. कुठलाही पुरस्कार हा गुणवत्तेवर दिला गेला पाहिजे, मी बारामतीचा आहे म्हणून तेथील शिक्षकांना गुणवत्ता नसेल तर द्यायचं नाही . विश्वासहर्ता संपली की माणूस बिनकामाचा होतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram