201 बारामती विधानसभा मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
विशेष मोहिमा दावे व हरकती स्विकारण्याच्या कलावधीत होणार आहेत.

201 बारामती विधानसभा मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
विशेष मोहिमा दावे व हरकती स्विकारण्याच्या कलावधीत होणार आहेत.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
मा.भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 09 ऑगस्ट 2021 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व प्रमाणीकरण करणे, दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणी/पडताळणी करणे व योग्य प्रकारे विभाग /भाग तयार करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
पुनरिक्षण उपक्रमामध्ये दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे. दि.1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्विकारणे. दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी दावे व हरकती निकालात काढणे.
विशेष मोहिमा दावे व हरकती स्विकारण्याच्या कलावधीत होणार आहेत. दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचे सहा. मतदार नोंदणी अधिकारी, 201 बारामती विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.