2024 ला इंदापूर तालुक्याच्या आमदार कॉंग्रेसचा असेल…नाना पटोलेचा दावा
आमच्याकडे पक्षाला मानणाऱ्या लोकांसाठी जागा खाली आहे

2024 ला इंदापूर तालुक्याच्या आमदार कॉंग्रेसचा असेल…नाना पटोलेचा दावा
आमच्याकडे पक्षाला मानणाऱ्या लोकांसाठी जागा खाली आहे
इंदापूर:- बारामती वार्तापत्र
तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो असं सूचक विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक प्रचारसभेत केलं होतं. या विधानाचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समाचार घेत फडणीसांवर पलटवार केलाआहे.
फडणवीस खोटी आश्वासने देऊन जनेतेची फसवणूक करतात हाच त्यांचा धंदा आहे. मागील झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जनतेने यामुळेच त्यांचा कार्यक्रम केला आहे.असं नाना पटोले म्हणाले आहेत.पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी ते आज पंढरपूला निघाले असता इंदापूर मध्ये त्यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते.
भाजपाची लोक ही सत्ताजीवी लोक आहेत.त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही.देशात, राज्यात अनेकांचा कोरोनामुळे जीव जात असताना देशाचे पंतप्रधान प्रचारजीवी आहेत.खरं तर त्यांनी देशभरातील प्रत्येकाच्या जिवाची काळजी करायला पाहिजे.मात्र असं न करता ज्या पाच राज्यात निवडणूका चालू आहेत.त्या ठिकाणी ते प्रचार करत आहेत. असे पहिल्यांना प्रचारजीवी प्रधानमंत्री भारत देशाने पाहिले अशा शब्दात पटोले यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
भारत देशाला विकण्याच्या कामाशिवाय भाजपा दुसरं काम करु शकत नाही.
भारत देशाला विकण्याशिवाय दुसरं काम भाजप करु शकत नाही.पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भाजपा चा दारूने पराभव झाला पाहिजे,जेनेकरुन त्यांची अक्कल ठिकाणावर आली पाहिजे. असं आवाहन त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील मतदारांना केलं आहे.
इंदापूर विधानसभेचा पुढचा आमदार काँग्रेसचाच ! प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे संकेत
आमच्याकडे पक्षाला मानणाऱ्यांसाठी जागा आहे,मात्र संधी साधणाऱ्यांसाठी नाही,पक्षाची दारे सर्वांसाठी उघडी असून ज्याला पक्ष म्हणून काम करायचं असेल सत्तेसाठी नाही.अशा सर्वांसाठी काँग्रेसची दारे खुली आहेत.२०२४ मध्ये काँग्रेसच राज्यातील सर्वात मोठा सत्तेतील पक्ष राहणार आहे.इंदापूर विधानसभेत तालुक्यात काँग्रेसला मानणारा वर्ग घराघरात आहे.काँग्रेसची विचारधारा प्रत्येक खेड्यांपर्यंत पसरलेली आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्यातून पुढचा आमदार हा काँग्रेसचाच होणार असे संकेत त्यांनी दिले.