क्राईम रिपोर्ट

बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी, बेकायदेशिर पिस्टल विकी करणा-या आतंरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

आता पर्यंत १२ पिस्टल व २० राउंडस केले हस्तगत

बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी, बेकायदेशिर पिस्टल विकी करणा-या आतंरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

आता पर्यंत १२ पिस्टल व २० राउंडस केले हस्तगत

बारामती वार्तापत्र

मागील आठवडयामध्ये बारामती तालुका पोलीस ठाण्यातील गु.र क २५/२०२१ भादवि कलम ३९४,३८५,३४ वगैरे या जबरी चोरी मधील आरोपीकडे विना परवाना पिस्टल मिळाले होती. त्याच्याकडे कसुन चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर मित्रांकडेही विनापरवना पिस्टल असल्याची माहिती दिली होती. त्यावरून यापुर्वी नमुद आरोपीताच्या मित्रांकडून ७ पिस्टल व १० रांउडस हस्तगत करण्यात आलेले होते. सदर गुन्हयाचा तपास सुरू असताना खालील नमुद इसम हे पिस्टल विक्री करण्यास येणार असल्याची खात्रीशिर माहिती गुन्हेशोध पथकाला माहिती मिळाली होती.

त्याअनुषंगाने खालील नमुद इसमांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता आणखी ५ पिस्टल व १० रांउडस मिळून आले असून नमुद आरोपीता विरोधात गुन्हे नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

अटक आरोपींची नावे
१.हनुमत अशोक गोलार वय २२ वर्षे रा.जवळवाडी,खरवंडी कासार ता.पाथर्डी. जि.अहमदनगर (गु.र.क ६४/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५)

२.अल्ताफ सज्जद पठाण,वय ३० वर्षे रा. नाईकवाडी मोहल्ला,ता.शेवगाव. जि.अहमदनगर (गु.र.क ६५/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५)

३.संतोष प्रभाकर कौटुंबे, वय ३८ वर्षे रा. मारवाड गल्ली ता. शेवगाव जि. अहमदनगर (गु.र.क ६६/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५)

४.जफर अन्सार इनामदार वय २८ वर्षे रा नाईकवाडी मोहल्ला. ता शेवगाव जि अ. नगर
(गु.र.क ६७/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५)

५.जावेद मुनीर सय्यद , वय २२ वर्षे रा.आखेगाव रोड,भापकर वस्ती, ता.शेवगाव. जि.अहमदनगर
(गु.र.क ६८/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५)

अशा प्रकारे आता पर्यंत ११ आरोपींताना अटक करून त्यांच्याकडून १२ पिस्टल व २० रांउडस हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई मा. मा.पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामिण श्री.अभिनव देशमुख सो,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पोलीस हवालदार दादा ठोंबरे,पोलीस कॉस्टेबल नंदु जाधव,राहुल पांढरे,विजय वाघमोडे,मंगेश कांबळे,विनोद लोखंडे,दत्तात्रय मदने यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!