विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन
एकूण ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन
एकूण ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागाच्या वतीने पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या **नवीन कल्पनांना वाव देण्यासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण ९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेली सर्व पोस्टर्स पाहून त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले. प्रास्ताविक डॉ. जगदीश सांगवीकर यांनी केले, तर समन्वयक म्हणून गौतम कुदळे यांनी भूमिका पार पाडली.
स्पर्धेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय ज्ञान प्रणाली ही थीम देण्यात आली होती. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी वास्तुशास्त्र, योग, शेती, क्रीडा, वस्त्रोद्योग, गणित, ए. आय. चा उपयोग अशा विविध विषयांवर पोस्टर सादर केली. स्पर्धेचे परीक्षण क्रांती सपकळ आणि योगिता सोलनकर यांनी केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे आहेत :
– प्रथम पारितोषिक – सृष्टी भाी यानी, वैष्णवी बारवकर आणि रोशनी पंजाबी यांच्या गटाने मिळवले.
– द्वितीय पारितोषिक – प्रांजली पवार, सृष्टी कनवार आणि पायल जाधव यांच्या गटाने पटकावले.
– तृतीय पारितोषिक – अनुष्का पवार आणि श्रेया पवार यांच्या गटाला मिळाले.
या उपक्रमास गजानन जोशी, नीलिमा पेंढारकर, किशोर ढाणे आणि डॉ. संगीता थोरात यांची विशेष उपस्थिती लाभली. विभाग प्रमुख गजानन जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रमा रोडे, तृप्ती कदम,कल्पना भोसले, श्रद्धा ननवरे, प्रिया साळुंखे, सोनाली ढवळे, अमृता कांबळे आणि सरोजा लांडगे* यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.