शैक्षणिक

ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती मार्फत कांबळेश्वर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सिताराम सस्ते यांचा डॉ . एपिजे अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरव 

विविध नामांकित शाळांमधून २५ विद्यार्थी शाळेत दाखल

ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती मार्फत कांबळेश्वर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सिताराम सस्ते यांचा डॉ . एपिजे अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरव 

विविध नामांकित शाळांमधून २५ विद्यार्थी शाळेत दाखल

बारामती वार्तापत्र 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर शाळेतील विविध उपक्रमामुळे शाळेतील मुख्याध्यापक यांचा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक म्हणून ऋग्वेद हेल्थ फाउंडेशन बारामती यांचेकडून कार्याचा गुणगौरव करण्यात आला .जून २०१८ मध्ये शाळेचे मुख्याध्यापक म्हणून पदभार घेतल्यानंतर विपरीत परिस्थितीमध्ये घसरलेला पट , पालकांची शाळेबद्दल अनास्था , भौतिक शैक्षणिक सोयींची उदासिनता ही मोठी डोकेदुखी असताना पालक – समाज -शिक्षक या सर्वांच्या सहकार्यांमधून पालकांचा विश्वास संपादन करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बद्दलची आवड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले . शाळेचा पट पहिल्याच वर्षी 100 पेक्षा जास्त करण्यात यश मिळाले .

सातत्याने इंग्रजी खाजगी माध्यमातून विद्यार्थ्यांच्या
पालकांची मनस्थिती बदलणे जिल्हा परिषद शाळेतही उत्तम शिक्षण मिळते ही भूमिका पटवून देण्यात यश आले पहिल्याच वर्षी इंग्रजी खाजगी माध्यमातून ३५ विद्यार्थी दाखल करून घेण्यात यश आले . त्यामुळे पालकांना होणारा नाहक शिक्षण प्रवास खर्च याच्यावरती आळा बसला .

त्याचबरोबर शाळेमध्ये कला, क्रीडा गायन -वादन, नृत्य ,नाट्य स्पर्धा परीक्षा ,मल्लखांब, संगणक साक्षरता , उन्हाळी बाल संस्कार शिबिरे अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सहशाले उपक्रमाबरोबरच प्रामुख्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीकडे जादाचे लक्ष दिल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ होण्यास मदत झाली .
शाळेच्या भौतिक सुविधा अंतर्गत शाळेमध्ये तारेचे वॉल कंपाऊंड असताना पदाधिकारी पंचायत समिती ,जिल्हा परिषद फंड पाठपुराव्यामधून जिल्हा परिषद सदस्या सौ मिनाक्षी तावरे यांच्या फंडामधून शंभर टक्के पक्के कंपाऊंड पूर्ण करून शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी आकर्षक वर्ग सजावटी, भितीचित्रे , आकर्षक बोलक्या भिंती, वृक्षारोपण – वृक्षसंवर्धन ,शाळेमध्ये शौचालयासाठी सीएसआर फंडामधून पियाजो कंपनीकडून 15 लाख रुपयांचे शौचालय मिळवण्यात यश आले .

जिल्हा परिषद फंड, सीएसआर फंड असा विविध माध्यमातून भौतिक सुविधा अंतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून शाळेमध्ये भौतिक सुविधा अंतर्गत 70 लाख रुपयांची कामे करण्यात यश आले .

जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रामुख्याने शाळा पूर्वतयारी वर्गाच्या दरवर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये दाखल पात्र विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करून विद्यार्थ्यांच्या मध्ये शाळा पूर्वतयारी करण्याचे नियोजन यासाठी लागणारा मानधन स्वरूपात शिक्षक मिळवले जातात .

शंभर टक्के पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करण्याच्या नियोजनामुळे पालकांचा विश्वास संपादन झाल्यामुळे इंग्रजी खाजगी माध्यमातून मागील सात वर्षाच्या काळामध्ये १५० पेक्षा जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये खेचून आणण्यात यश मिळाले आहे .

आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवल्यामुळे शाळेतील सर्व सहकारी शिक्षक यांच्या मदतीने शाळेमध्ये गुणवत्ता वाढीसाठी सर्वांच्या सकारात्मक दृष्टिकोनातून हे यश संपादन झाल्याचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी सांगितले .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची पटाची दयनीय अवस्था असताना गेले सात वर्ष शाळेतील शिक्षकांच्या मदतीने पालकांच्या मध्ये विश्वासाहर्ता निर्माण करून शाळेचा पट सातत्याने शंभर पेक्षा जास्त ठेवण्यात शिक्षकांना यश मिळाले . आहे 2024 -25 या शैक्षणिक वर्षापासून शाळेमध्ये विविध नामांकित शाळांमधून २५ विद्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत .

शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी मागील एक वर्षापासून शाळेमध्ये अबॅकस वर्गाचे आयोजन आणि नियोजन केल्यामुळे ग्रामीण भागामधील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यां पेक्षा कमी पडणार नाहीत याकडे जाणिवपूर्वक लक्ष दिले जाते . विविध उपक्रम पालक सहकार्यांमधून राबविल्यामुळे शाळेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा बरोबरच अबॅकस मध्ये राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत चमकल्याचे दिसून येते .
शाळेमध्ये होणारे विविध उपक्रम हे ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती,

पालक या सर्वांच्या सहकार्यामधून सुरु आहेत . शाळेला चांडाळ चौकडीच्या करामती यांच्या माध्यमातून बरीच भरीव मदत असून केवळ मदतच नाही तर संपूर्ण टीमच्या सर्व कलाकारांनी स्वतःची मुले जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेऊन शिकवून एक आदर्श समाजापुढे ठेवला असून आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊन वाटचाल करत असून आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होत आहोत त्यामुळे केवळ खाजगी किंवा इंग्रजी माध्यमांमध्ये मुले घातली म्हणजे त्यांचा विकास होईल या बाबीला फाटा देत त्यांनी आपली मुले जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल केल्यामुळे आणि शिक्षकांनी आपल्या प्रति ठेवलेला विश्वासास पात्र राहून शालेय गुणवत्ता वाढीसाठी झोकून देऊन काम केल्यामुळेच शाळेचा पट वाढण्यास मदत होत आहे .

केवळ एकट्या मुख्याध्यापकांनी काम केले म्हणजे झाले असे होत नसून सर्व शिक्षकांची एकजूट ,प्रामाणिकपणे सकारात्मक काम करण्याचा दृष्टीकोन आणि पालक वर्गाची साथ यामधून शक्य झाल्याचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी सांगितले .

ही आवडते मज मनापासून शाळा । लावते लळा जसा माऊली बाळा ॥या उक्तीप्रमाणे शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये शाळेबद्दल आपुलकीचे संबंध निर्माण केल्यामुळे विद्यार्थी पट वाढ होण्यास मदत झाली .

शाळेच्या विविध उपकमामुळे पुढील शैक्षणिक वर्षात इ १ली मध्ये ३० विद्यार्थी दाखल झाले असून शाळापूर्व तयारी शाळेमध्ये सुरु आहे .

शाळेतील उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ . सुनिता शिंदे , सौ मनिषा चव्हाण पालकांना शिष्यवृत्ती , जवाहर नवोदय, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षांची तयारी प्राथामिक स्तरावर विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करत असून १००% मुख्याध्यापक – शिक्षक यांच्या नियोजनातून विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणात खाजगी इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत ग्रामिण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर ही जिल्ह्यात आदर्श उपक्रम शिल शाळा म्हणून उदयास येत आहे . ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच शाळा व्यवस्थापन अध्यक्षा सर्व सदस्य शिक्षक पालक या सर्वांनी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेबद्दल कौतुक व अभिनंदन केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!