
राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी टेक्निकलच्या 8 विद्यार्थांची निवड
6 विद्यार्थांची निवड
बारामती वार्तापत्र
बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या आर.एन.आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज च्या 8 विद्यार्थांची राष्ट्रीय शिष्यवृत्ती साठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थांसाठी NMMS ही परीक्षा घेण्यात येते.यातील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना इ 12 वी पर्यंत दरवर्षी 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळते.
यामध्ये विद्यालयातील पृथ्वीराज ओवेकर व प्रांजली भोसले या शिष्यवृत्ती प्राप्त झाल्या.तर सारथी शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी 9600 रुपये शिष्यवृत्ती मिळते.यामध्ये 6 विद्यार्थांची निवड झाली आहे.श्रावणी सपकळ,शर्वरी मोहिते,घाडगे ऐश्वर्या, मंडलिक समर्थ, नलावडे नंदन, खलाटे रुद्र यांची निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थी ,विभागप्रमुख श्री सोमनाथ मिंड तसेच सर्व विषयशिक्षक यांचे अभिनंदन विद्यालयाचे प्राचार्य श्री भगवान भिसे,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,पर्यवेक्षक सौ.अलका चौधर यांनी केले.
तर विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री सदाशिव सातव यांनी सर्वांचे अभिनंदन केले.