स्थानिक

बारामती एमआयडीसीतील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी – धनंजय जामदार

लहान मोठ्या समस्या उद्योजक व कामगारांना भेड्यावत आहेत.

बारामती एमआयडीसीतील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी – धनंजय जामदार

लहान मोठ्या समस्या उद्योजक व कामगारांना भेड्यावत आहेत.

बारामती वार्तापत्र 

बारामती एमआयडीसीतील उद्योगांना अनेक समस्यांना वारंवार सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली आहे.

एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांच्या समवेत बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजकांची बैठक पार पडली त्यावेळी धनंजय जामदार बोलत होते.

यावेळी बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबिरशहा शेख वकील, कार्यकारणी सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, हरीश कुंभारकर, राजन नायर, उद्योजक चंद्रकांत नलवडे, अविनाश सावंत, रघुनाथ दाभाडे, आप्पासाहेब जाधव आदी मान्यवरांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.

धनंजय जामदार म्हणाले बारामती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात अनेक लहान मोठ्या समस्या वारंवार निर्माण होत असून त्यावर एमआयडीसी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून उद्योगांना दिलासा देणे अपेक्षित आहे.

अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा जंगली झाडाझुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ठराविक ठिकाणी गतिरोधक व ब्लिंकर्स बसवण्याची गरज आहे.

मोठे ट्रक व कंटेनर यांच्या रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीस होणारा अडथळा, नादुरुस्त पथदिवे, बेकायदेशीर टपऱ्या, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे खोदाई व मातीचे ढिगारे काढण्याचे प्रलंबित कामे, दुभाजकांची उंची वाढवणे असे अनेक लहान मोठ्या समस्या उद्योजक व कामगारांना भेड्यावत आहेत.

यावर एमआयडीसी प्रशासनाने त्वरित उपाय योजना कराव्यात अशी मागणी अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन च्या शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिलेल्या समस्या सोडवनेसाठी एमआयडीसी प्रशासन विनाविलंब कार्यवाही करेल अशी ग्वाही कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांनी शिष्टमंडळाला दिली.

Back to top button