माहेश्वरी समाजाच्या वतीने बारामतीत श्री महेश नवमी उत्साहात साजरी
युवकांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली.

माहेश्वरी समाजाच्या वतीने बारामतीत श्री महेश नवमी उत्साहात साजरी
युवकांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली.
बारामती वार्तापत्र
माहेश्वरी समाज जगभर विखुरलेला असून सुमारे २०० वर्षापासून समाजातील काही परिवार जसे की लाहोटी, सोमाणी, सोनी, सिकची, काबरा, राठी, झंवर,बागडी, करवा, नावंधर, मालपाणी हे परिवार वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून कार्यरत आहे. ख-या लौकिक अर्थाने मारवाडी संबोधला जाणारा समाज. त्याचाआराध्य दैवत श्री.महेश, म्हणून माहेश्वरी अशी ओळख.
या वर्षी ४ जून ही महेश नवमी अर्थात माहेश्वरींचा उत्पत्ती दिवस या दिवशी बारामती माहेश्वरी समाजाच्या वतीने दि. १ जून २०२५ ला सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आयोजित केले त्यास सर्व समाजातील लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद या शिबिरास मिळाला त्यामध्ये २९ रक्त बॅग योगदान मिळाले.
समाजाच्या वतीने ४ जून २०२५ ला शोभायात्रा भक्तिभावाने जल्लोषपूर्ण वातावरणात श्री बालाजी मंदिर पासून गांधी चौक सिध्देश्वर मंदिराबाहेर भगवान शिवजी मूर्तीला फुलांचा हार माल्यार्पण करून महावीर पथ मार्गे परत श्री बालाजी म॔दिर अशी काढण्यात आली.
त्यामध्ये समाजातील श्री.सुभाषशेठ सोमाणी, मा. नगराध्यक्ष, बारामती व्यापारी महासंघाचे विद्यमान अध्यक्ष व काॅसमाॅस बँकेचे संचालक श्री.सुशीलकुमार सोमाणी , श्री. मंदार सिकची विद्यमान संचालक बारामती सहकारी बँक व विश्वस्त विद्या प्रतिष्ठान संस्था , श्री. संजय सोमाणी अध्यक्ष रिटेल ट्रेड भाजपा पुणे जिल्हा व्यापार आघाडी सर्व समाज बांधव, महिला व युवावर्ग उपस्थित होता.
बारामती माहेश्वरी प्रिमीयर लीगच्या माध्यमातून समाजातील युवकांनी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली.माहेश्वरी महिला मंडळानी ही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
या सर्व सामाजिक कार्यक्रमात माहेश्वरी समाजाचा सदैव सहभाग असतो.कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष शामसुंदर सोनी, सचिव. ॲड. सिद्धार्थ सोमाणी व बारामती माहेश्वरी महिला मंडळ. अध्यक्ष सौ. सुनीता राठी, उपाध्यक्षा सौ. संगीता राठी यांनी केले.