स्थानिक

बारामती नगरपरिषद मार्फत शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच, विक्रेत्याचा कारवाईस विरोध

सुमारे ६० ते ७० टपऱ्या व स्ट्रक्चर नगरपरिषद मार्फत जप्त

बारामती नगरपरिषद मार्फत शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच, विक्रेत्याचा कारवाईस विरोध

सुमारे ६० ते ७० टपऱ्या व स्ट्रक्चर नगरपरिषद मार्फत जप्त

बारामती वार्तापत्र 

अतिक्रमण विरोधी कारवाई दिनांक ९/६/२०२५ ते
११/६/२०२५ तीन दिवस बारामती नगरपरिषद मार्फत शहरातील मुख्य वाहतुकीचे रस्ते मुख्य
वाहतुकीचे चौक या ठिकाणी अतिक्रमणे, टपऱ्या स्ट्रक्चर, हातगाडे, शेड असणाऱ्यांना यापूर्वी
नगरपरिषद मार्फत नोटीस देऊन सदर टपऱ्या, अतिक्रमणे काढण्याबाबत सूचित करण्यात आले
होते.

त्यानुसार देशमुख चौक, सातव चौक या ठिकाणी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे
काढून सदर जागा मोकळा करून दिल्या परंतु ज्यांना अतिक्रमणधारकांनी नगरपरिषदेच्या नोटीसचे अनुपालन न करता अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली नव्हती अशा अतिक्रमणांवर नगरपरिषद मार्फत आज दिनांक १०/६/२०२५ रोजी अतिक्रमण विभाग व नगर परिषदेचे सुमारे १५० अधिकारी, कर्मचारी व पोलीस विभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त घेऊन कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई मध्ये बारामती नगरपरिषद मधील प्रमुख रस्ते कॅनल पूल चौक ते सिनेमा रस्ता,
इंदापूर चौक, इंदापूर चौक ते गुणवडी चौक, गुणवडी चौक ते गुणवडी रस्ता अशा ठिकाणी असणाऱ्या टपऱ्या, अतिक्रमणे काढण्यात आले.

सदर अतिक्रमणामध्ये अतिक्रमण कारवाईमध्ये सुमारे ६० ते ७० टपऱ्या व स्ट्रक्चर नगरपरिषद मार्फत जप्त करण्यात आलेले असून सदर जप्त केलेली ना परतावा असल्यामुळे ते नागरिकांना परत मिळणार नाही तसेच यापुढे देखील सदर कारवाई सुरू राहणार असून शहरातील मुख्य रस्ते, मुख्य चौक या ठिकाणी स्ट्रक्चर टाकलेल्या नागरिकांना नगरपरिषद मार्फत आव्हान करण्यात येते की, सदर अतिक्रमणे, टपरी स्ट्रक्चर्स त्यांनी स्वतःहून तत्काळ काढून घ्यावे व नगरपरिषदला सहकार्य करून नागरिकांच्या सोयी सुविधानाला सहकार्य करावे.

गुणवडी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होती व सदरील ठिकाणी वारंवार
वाहतुकीस अडथळा येत होता त्या ठिकाणच्या अतिक्रमणे काढल्यामुळे वाहतुक सुरळीत होण्यास
मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

Related Articles

Back to top button