क्राईम रिपोर्ट

धक्कादायक घटना;पंढरपूरला देव दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार;दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला लावला कोयता अन्..

हल्लेखोरांनी कुटुंबातील महिला आणि पुरुषांच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली

धक्कादायक घटना;पंढरपूरला देव दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार;दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला लावला कोयता अन्..

हल्लेखोरांनी कुटुंबातील महिला आणि पुरुषांच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली

बारामती वार्तापत्र 

पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला कोयता लावून फरडफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच इतर महिलांच्या गळ्यातील दीड लाखांच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने लुटून दरोडेखोर पसार झाले. दरम्यान, या घटनेने दौंड तालुकाच नव्हे तर महाराष्ट्र राज्य हादरले आहे.

दौंड तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे हा प्रकार घडल्याचा समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी पत्रकारांशी दिली.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चार चाकी गाडीतून एक कुटुंब पंढरपूरला देवदर्शनसाठी जात असताना, सोमवारी (दि.३०) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्वामी चिंचोली येथे महामार्ग लगत असलेल्या एका टपरी जवळ चार चाकी वाहनातून काही महिला व पुरुष या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दोन अज्ञात इसम याठिकाणी दुचाकीवरून आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून, डोळ्यांमध्ये लाल रंगाची चटणी टाकून महिलांच्या गळ्यातील १ लाख ५० हजाराचे दागिने लुटले आणि त्यातील एकाने एका अल्पवयीन मुलीला टपरीच्या पाठीमागे असलेल्या नाल्या शेजारील झाडीमध्ये अंधारात फरपटत नेऊन तिच्याबरोबर बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌.

पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान , या घटनेने दौंड तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलीस अज्ञात संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, घटनास्थळी बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार , दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक अविनाश शिळीमकर , पोलीस निरीक्षक गोपाळ पवार , नारायण देशमुख आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.

या प्रकरणावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, चहासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लूटमार करण्याची आणि वारकऱ्यांसोबतच्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात गुंडांनी अत्याचार केल्याची दौंडमध्ये घडलेली घटना ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. राज्यात कुठलीही कायदा व सुव्यवस्था राहिली नसून गुंडांना कशाचाही धाक उरलेला नाही. आज वारकरीही सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रात जंगलराजच सुरू आहे, असंच म्हणावं लागेल. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याऐवजी केवळ गप्पा हाणणारे गृहमंत्री कधी जागे होतील? काल कर्जत-जामखेड तर आज दौंड… दररोजच कुठं ना कुठं अत्याचाऱ्याचा घटना घडत आहेत, पण सरकार लक्ष द्यायला तयार नाही, हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

मुलीवर अत्याचार

लुटमार करत असताना यातील एका चोराने गाडीतील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने काही अंतरावर ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चहासाठी जिथे थांबले होते त्याच्या लगत झाडझुडपं आहेत. चोरट्यांनी पीडित मुलीला फरफटत झाडझुडपांमध्ये नेलं.

या अमानुष घटनेमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. दौंड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दौंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Related Articles

Back to top button