बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या नूतन पदाधिका-यांचा शपथविधी सोहळा संपन्न
कामगार प्रशिक्षणाबाबत कार्यशाळा

बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती सेंटरच्या नूतन पदाधिका-यांचा शपथविधी सोहळा संपन्न
कामगार प्रशिक्षणाबाबत कार्यशाळा
बारामती वार्तापत्र
बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक टिकाऊ व मजबूत इमारती कशा होतील याचा प्रयत्न असोसिएशनने करावा, असेही त्यांनी नमूद केले.
बिल्डर असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, माजी राष्ट्रीय अध्यक्ष निलिमेश पटेल, उपाध्यक्ष आनंद गुप्ता या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
साहिल सुरेश खत्री यांनी नूतन अध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण केली. कामगार प्रशिक्षणाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यासह बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही साहिल खत्री यांनी दिली.
त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष सुभाष धिमान, सचिव आदेश वडूजकर, खजिनदार डी.एस. रणवरे, सहसचिव जितेंद्र जाधव तसेच गव्हर्निंग कौन्सिल सदस्य संजय संघवी, शामराव राऊत, एक्झिक्युटीव्ह कमिटी सदस्य किशोर मेहता, मनोज पोतेकर, आशपाक सय्यद, उध्दव गावडे, सुभाष जांभळकर, चंद्रकांत शिंगाडे, विक्रांत तांबे, राजेंद्र खराडे, अविनाश लगड, सुनिल देशमुख, अविनाश सूर्यवंशी, सुशील घाडगे, नितिश शहा यांनीही शपथ घेतली.
थोडी जबाबदारीही उचला….
बिल्डर असोसिएशन व त्यांच्या सारख्या संस्थांनी या शहराच्या विकासाच्या दृष्टीने तुम्हाला झेपेल इतकी जबाबदारी सामाजिक बांधिलकी या नात्याने घ्यायला हवी, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.