स्थानिक

बारामती येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

विद्यार्थिनींना निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरूण पांघरून व दरमहा खर्चासाठी निर्वाह भत्ता देण्यात येतो.

बारामती येथील सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

विद्यार्थिनींना निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरूण पांघरून व दरमहा खर्चासाठी निर्वाह भत्ता देण्यात येतो.

बारामती  वार्तापत्र

सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय व आर्थिकदृष्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्याकरिता https://hmas.mahait.org  या संकेतस्थळावर 23 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती. आर्थिक मागास, विशेष मागास, दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील विद्यार्थीनींना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थिनींना निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरूण पांघरून व दरमहा खर्चासाठी निर्वाह भत्ता देण्यात येतो.

वसतिगह प्रवेशाकरिता अधिकाधिक विद्यार्थीनींना अर्ज करुन या संधीचा लाभ घ्यावा, प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी वसतिगृहात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षिका सविता खारतोडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

Related Articles

Back to top button