स्थानिक

सेवा पंधरवडा अंतर्गत बारामतीच्या सुपा मंडळात शेतांसाठी ९६ नवे रस्ते

विभागीय आयुक्तांनी भेट देऊन केले कौतुक

सेवा पंधरवडा अंतर्गत बारामतीच्या सुपा मंडळात शेतांसाठी ९६ नवे रस्ते

विभागीय आयुक्तांनी भेट देऊन केले कौतुक

बारामती वार्तापत्र

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित सेवा पंधरवड्यात बारामती तालुक्यातील सुपा मंडळाचे मंडळ अधिकारी हंसध्वज मनाळे आणि त्यांच्या सर्व ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत पाच दिवसांमध्ये नव्याने ९६ रस्ते करून दिले आहेत. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी आज मंडल अधिकारी कार्यालयास भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

सेवा पंधरवडामध्ये पहिला टप्पा रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत याबाबतीत होता. या पहिल्या टप्प्यांमध्ये सुपा मंडळ करेला अंतर्गत चांगले काम झाले आहे. आता या रस्त्यांची नोंद गाव नकाशावर आणि अधिकार अभिलेखांमध्ये घेण्यात येत आहे. हे काम अत्यंत प्रशंसनीय असल्यामुळे डॉ. पुलकुंडवार यांनी महसूल अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनीदेखील याबाबत समाधान व्यक्त केलं.

मंडळ अधिकारी कार्यालय परिसरामध्ये यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

Back to top button