स्थानिक

बारामतीमध्ये पुन्हा हायवा आणि स्कूल व्हॅनचा अपघात; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

स्कूल व्हॅन मध्ये एका पोलिसाच्या मुलाचाही समावेश

बारामतीमध्ये पुन्हा हायवा आणि स्कूल व्हॅनचा अपघात; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद, 

स्कूल व्हॅन मध्ये एका पोलिसाच्या मुलाचाही समावेश

बारामती वार्तापत्र 

बारामती मध्ये काल एका वृद्धाचा हायवा खाली मृत्यू झाल्यानंतर ते अपघाताला २४ तास होत नाही तोवरच बारामती मधील शाहू हायस्कूल समोर स्कूल व्हॅन व हायवा गाडीचा अपघात झाल्यानंतर स्कूल व्हॅन मधील तीन ते चार मुले सुदैवाने बचावले.

यामध्ये स्कूल व्हॅन मध्ये एका पोलिसाच्या मुलाचाही समावेश होता. अपघात झाल्यानंतर बारामतीतील नागरिकांनी या ठिकाणी रास्ता रोको केला. व संबंधित हायवा चालकावर व मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

आता बारामतीतील प्रशासन संबंधित वाहनावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Back to top button