“बारामतीत स्वच्छतेचा नवा अध्याय” शहरातील मंदिर स्वच्छता सेवा मंडळाच्या उपक्रमातून स्वच्छतेचा नवा संदेश!
बारामती हे धार्मिक,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे.

“बारामतीत स्वच्छतेचा नवा अध्याय” शहरातील मंदिर स्वच्छता सेवा मंडळाच्या उपक्रमातून स्वच्छतेचा नवा संदेश!
बारामती हे धार्मिक,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात स्वच्छतेचा आणि सामाजिक सहभागाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे.श्री सायली हिल गणेश मंदीर आणि सिद्धेश्वर मंदीर येथे मंदिर स्वच्छता सेवा मंडळाच्या वतीने झालेल्या स्वच्छतेच्या उपक्रमाने या मंडळाच्या कार्याचा शुभारंभ झाला.
हा उपक्रम बारामतीतील उद्योजक आणि सल्लागार सुशीलकुमार सोमाणी यांच्या प्रेरणेतून राबवला जात आहे.त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश धार्मिक स्थळे स्वच्छ व पवित्र ठेवण्याबरोबरच नागरिकांमध्ये सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे असा आहे.
बारामती हे धार्मिक,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कऱ्हा आणि निरा नद्यांचा संगम असलेल्या या प्रदेशात संत श्रीधर स्वामींनी शिवलीलामृत ग्रंथ लिहिला, तर कविवर्य मोरोपंतांनी आपल्या केकावली ग्रंथातील आर्या येथेच रचल्या. अशा या वैभवशाली स्थळांवरील पावित्र्य जपण्यासाठी मंदिर स्वच्छता सेवा मंडळाने शहर व परिसरातील मंदिरांच्या नियमित स्वच्छतेचे कार्य हाती घेतले आहे.
या मोहिमेअंतर्गत दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून,उपक्रमाच्या पहिल्या दिवशी अनेक तरुण आणि नागरिकांनी या उपक्रमात स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला.बारामतीतील नागरिकांनी या सामाजिक कार्याचे मनापासून स्वागत करत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.






