31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु,अजित पवार यांची विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा
अधिवेशनात विरोधकांनी एमपीएससीवरून सरकारला कोंडीत घालण्याचा प्रयत्न केला.

31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु,अजित पवार यांची विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा
अधिवेशनात विरोधकांनी एमपीएससीवरून सरकारला कोंडीत घालण्याचा प्रयत्न केला.
मुंबई :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी (MPSC) आणि स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. 31 जुलै 2021 पर्यंतच्या एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरु, अशी घोषणा अजित पवार यांनी विधानसभेत केली.
अजित पवारांची मोठी घोषणा
स्वप्निल लोणकरच्या आत्महत्या प्रकरणावरून कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सुरुवातीलाच हल्ला चढवला. अधिवेशनात विरोधकांनी एमपीएससीवरून सरकारला कोंडीत घालण्याचा प्रयत्न केला. लाखो पोरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, अशा वेळी सरकार नेमकं काय करतंय… असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. त्यांनी 31 जुलै 2021 पर्यंतच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.