शैक्षणिक

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात.

शालेय आठवणींना उजाळा

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

शालेय आठवणींना उजाळा

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन नुकतेच धुमधडाक्यात पार पडले. यामध्ये विदयार्थ्यांसाठी व पालकांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले व विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले.

विद्यालयाचा क्रीडा महोत्सव दि. १५ ते १७ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. क्रीडा महोत्सवाचे उदघाटन कु. भक्ती गावडे, राष्ट्रीय थाळीफेक खेळाडू व मा. श्री. महेंद्र ओसवाल यांच्या हस्ते झाले.

दि. २६ डिसेंबर रोजी पालकांसाठी पौष्टिक पदार्थ बनवण्याच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, आनंद मेळावा व पाककृती स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री. विठ्ठल चौधरी, संस्थापक, बारामती फुड्स प्रा. लि. बारामती यांच्या हस्ते झाले. त्यांनी आहाराचे आरोग्यदायी फायदे सांगितले व शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

दि. २७ डिसेंबर रोजी विद्यालयाच्या वतीने सर्व विदयार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला व पालकांसाठी पालक प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून मा.श्री. आदित्य शिंदे, व्यवस्थापक नवनगर विद्यालय, निगडी गुरुकुल पुणे हे उपस्थित होते त्यांनी पालक हे विदयार्थ्यांच्या जडण-घडणीत कशा प्रकारे महत्त्वाची भुमिका निभावतात याबद्दल मार्गदर्शन करून पालक स्पर्धांचे पारितोषिक वितरण केले. तसेच मा. श्री. अजित काकडे, संगीत विशारद यांनी पालकांना संगीतातून ध्यान धारणा याचे मार्गदर्शन केले.

दि.२९ डिसेंबर रोजी खेळिया the play Group, अंकुर बालभवन व प्राथमिक विभागाच्या विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. केतन जाधव, संस्थापक, स्काय अ‍ॅग्रो लिमिटेड, बारामती व मा. श्री. गजानन किसनराव तावडे उप-आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग, मुंबई हे उपस्थित होते त्यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले.

तसेच दि. ३० डिसेंबर रोजी गुरुकुल विभाग विविध गुणदर्शन व बक्षीस वितरण या कार्यक्रमासाठी मा. श्री. हनुमंत जगताप, प्लान्ट मॅनेजर, श्रायबर डायनामिक्स डेअरी, बारामती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शालेय आठवणींना उजाळा मिळाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. श्रीकृष्ण अभ्यंकर, मुख्य समन्वयक, पंचकोशाधारित गुरुकुल हे उपस्थित होते त्यांनी शालेय उपक्रमांचे व शाळेच्या शालेय प्रगतीच्या वाढत्या आलेखाचे कौतुक केले. प्राथमिक विभागाचा विविध गुणदर्शन कार्यक्रम ‘मौज मस्ती’ या कल्पनेवर तर माध्यमिक विभागाचा ‘रामायण’ या कल्पनेवर आधारित होता.

तसेच स्नेहसंमेलन प्रसंगी बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा.श्री. सचिन शेठ सातव व नगरसेवक मा.श्री. नवनाथ बल्लाळ यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष मा. श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष मा. श्री. हृषिकेश घारे (सर), सचिव मा. श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा. श्री. सतीश धोकटे, व सर्व संचालक मंडळ तसेच गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, स्नेहसंमेलन प्रमुख राणीताई झगडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक – विद्यार्थी कुटुंब प्रमुखाप्रमाणे सामील होते.

तसेच हा सर्व वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, बारामती या ठिकाणी नियोजनबद्ध पार पडला. या कार्यक्रमाला विदयालयातील सर्व पालकांचे सहकार्य लाभले या सर्व स्पर्धांचे व कार्यक्रमाचे नियोजन आचार्य, मुख्याध्यापक व कृतीशील शिक्षक – शिक्षकेतर वर्ग यांनी केले.

Back to top button