32 वर्षांनंतर ते आले एकत्र – राज्यमंञी दत्ताञेय भरणे .
बारामती 1988 ची बीकॉम ची बॅच एकत्र
बारामती वार्तापत्र
1988 साली जे मित्र वर्गात एका बेंचवर बसत होते ते तीस वर्षात कधी फोनवर किंवा कधी रस्त्याने भेटत होते मात्र बारामती 1988 ची बीकॉम ची बॅच आज एकत्र आली त्यामध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह सर्व मित्र एकत्र आले होते.
शुक्रवारी संध्याकाळी बारामती येथे हाँटेल सिटी ईन मध्ये अनेकांत एज्यूकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या बी काँम् बँच सन १९८८ च्या वर्गमित्रांनी श्री.दत्ताञेय भरणे हे सार्वजनिक बांधकांम राज्यमंञी झाल्यामुळे वर्गमिञांच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्या सत्कार समारंभाला उत्तर देताना श्री.भरणे बोलत होते .
जिवनात चढ उतार हे नेहमीच येत असतात ,मी एका शेतकरी कुंटूंबा मध्ये जन्माला आलो माञ मला राज्यांचे उपमुख्यमंञी अजित पवार यांचे खुप मोलाचे सहकार्य मिळाले ,ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे कुशल नेवृत्व लाभले तर खासदार सौ.सुप्रिया सुळे यांनी उत्तम मार्गदर्शन केल्यामुळेच मला राजकिय यश मिळाले ,
छञपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंङळा चा सदस्य ते चेअरमन ,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक व अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा परीषद सदस्य व अध्यक्ष आणि नंतर इंदापुरचे आमदार आणि आता राज्यमंञीपद असा यशस्वी राजकिय कारकिर्दीची यशोगाथा व्यक्त करताना आपल्या आठवणी सांगितल्या, काँलेज जिवनातील विविध जून्या आठवणीला या सत्कार समारंभाच्या निमित्ताने उजाळा मिळाला, या वेळी उपस्थित मिञांनी प्रत्येकाच्या ओळखी सोबतच पत्नीची ओळख करून दिली
लक्ष्मीकांत रोहाणी यांनी उपस्थितांचे स्वागत केले,प्रविण आहुजा यांनी प्रस्ताविक केले तर कुमार पवार ,सुधिर जन्नू ,मेघा बङवे,अभिनंदन शहा,राजेंद्र पवार ,बाबासाहेब ढोबळे ,सोमनाथ काटे ,आदीचे समायोचित भाषणे झाली ,सुञसंचालन करीत शेवटी उपस्थितांचे अभार मंगेश वैद्य यांनी मानले ,अल्पोपहारा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.बहुसंख्य वर्गमिञ जोङीने या सत्कार समारंभाला उपस्थित होते.