आपला जिल्हा

मंत्री दत्तात्रय भरणे–हर्षवर्धन पाटील एकत्र : इंदापूर तालुक्याच्या विकासाला नवी दिशा : सरपंच अजित खबाले

विकासाला मोठी चालना मिळणार

मंत्री दत्तात्रय भरणे–हर्षवर्धन पाटील एकत्र : इंदापूर तालुक्याच्या विकासाला नवी दिशा : सरपंच अजित खबाले

विकासाला मोठी चालना मिळणार

इंदापूर,आदित्य बोराटे –

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दोन प्रभावी नेते एकत्र आल्याने इंदापूर तालुक्यातील विकासाला मोठी चालना मिळणार असून, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली फूट कायमची संपेल, असा विश्वास भाटनिमगावचे सरपंच अजित खबाले यांनी व्यक्त केला. वडापुरी–माळवाडी गटाच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.

इंदापूर तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र आल्याने तालुक्याच्या विकासाच्या अपेक्षा अधिक बळावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाटनिमगावचे सरपंच अजित खबाले यांनी या एकत्र येण्याचे स्वागत करताना, “या दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली राहिलेला विकास निश्चितपणे पूर्ण होईल,” असे ठाम मत व्यक्त केले.

खबाले म्हणाले की, आतापर्यंत राजकीय मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये फळी पडत होती. मात्र आता नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांनीही एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. एकत्रित प्रयत्नांमधूनच गावागावातील प्रश्न मार्गी लागतील आणि जनतेला अपेक्षित असलेला विकास साध्य होईल.

“नेत्यांनी दिलेल्या विश्वासाचा मान राखून मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणार आहे. लोकांची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा शब्द मी देतो,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी जनतेचा कौल आपल्याच उमेदवारांना मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

यावेळी त्यांनी वडापुरी–माळवाडी गटातील तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत, विकासाच्या मार्गावर एकत्र चालण्याचा निर्धार व्यक्त केला.

Back to top button