3359 संशयीत कुठे आढळले?
भारतीय जैन संघटनेच्यामाध्यमातून सुरू असलेल्या “डॉक्टर आपल्या दारी” मोफत आरोग्य तपासणी मोहीमेच्या माध्यमातून महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून 6 मे दरम्यान 139 मोबाइल डिस्पेंसरी वॅनच्या साह्याने 3,12,199 नागरिकांची तपासणी केली असून 3359 संशयीत रुग्णांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. राहाता नगरपरिषद तसेच डॉ.राजेंद्र पिपाडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या उपक्रमात राहाता शहरातून 6 मे पर्यंत 2242 तपासणी करण्यात आली असुन सुदैवाने एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही.
डॉक्टर आपल्या दारीची धुरा डाॅ.राजेंद्र पिपाडा यांनी स्वत: सांभाळली असुन, या मध्ये काही विशेष उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले. नागरिकांना विशिष्ट पद्धतीने ठराविक वेळाने टप्प्यात कर्मचार्यांच्या माध्यमातून बोलवून गर्दी टाळली जाते. मोहिमेत सहभागी कर्मचारी विशिष्ट परिधानामध्ये बोलवण्यात आले आहे, जसे फुल स्लीव्हचे शर्ट, बुट व मास्कचा वापर करण्यास सांगितले आहे. नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना अंतराणे उभे करण्या सोबत वयोवृद्ध व्यक्ती व बालकांना वेगळे व आधी पासून त्रास असलेल्यांना वेगळे उभे करण्यात येते. तपासणी वेळी नागरिकांच्या हातावर सॅनिटाझरचा वापर करून निर्जंतुक करण्यासह एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाताना जिथे नागरिकांचा स्पर्श झाला त्या साहित्याचेही खबरदारी म्हणून निर्जंतुक करण्यात येते.
मोहिमे दरम्यान राहाता नगरपरिषदेचे कर्मचारी,तसेच भारतीय जैन संघटना व जैन युवक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थीत राहुन सहकार्य करीत असल्याची माहिती डाॅ.पिपाडा यांनी दिली..