41 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर सेवानिवृत्त
बँकेच्या प्रगतीच्या टप्प्यात बहुळकर यांचे मोठे योगदान
41 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर सेवानिवृत्त
बँकेच्या प्रगतीच्या टप्प्यात बहुळकर यांचे मोठे योगदान
बारामती वार्तापत्र
ग्राहकांना सहकार्य करण्याची मानसिकता, ग्राहकांचे प्रश्न सोडवणे कामी सक्रिय असणारे ,मितभाषी श्रीनिवास बहुळकर आज बारामती सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले.
बहुळकर मूळचे बहूळ, तालुका खेड येथील असून ते 1980 झाली बारामती सहकारी बँकेत क्लार्क म्हणून सेवेत रुजू झाले .अकाउंटंट, मॅनेजर ,मुख्याधिकारी, सरव्यवस्थापक ते कार्यकारी संचालक असा प्रवास करत आज ते बँकेतून 41 वर्षानंतर निवृत्त झाले आहेत.
आज झालेल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बहुळकर यांनी बँकेत आपले योगदान दिले. बँकेच्या प्रगतीच्या टप्प्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
बँकेच्या स्थापनेवेळी दोन लाखाच्या ठेवी होत्या, त्यामध्ये वाढ होत 2165 कोटी रुपयांच्या ठेवी व 1265 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करत बँक विस्तारली. बँकेच्या एकूण छत्तीस शाखा आहेत. त्यामध्ये पंधरा शाखा बँकेच्या स्वमालकीच्या जागेवर आहेत तर उर्वरित जागेवर भाडेतत्त्वावर जागा आहे. कोर बँकिंग, नेट बँकिंग, आरटीजीएस अशा असंख्य आधुनिक तंत्राचा वापर करत ग्राहकांना सुविधा देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांच्या कारकिर्दीत अनेक चेअरमन व्हा.चेअरमन यांच्यासमवेत त्यांनी काम केले. अजित दादा पवार यांनी सत्कार समारंभात सांगितले की बहुळकर यांचे काम उल्लेखनीय असे राहिले आहे. त्यांनी यापुढे बँकेचे मार्गदर्शक म्हणून पुढील काळात आपली भूमिका बजवावी. बँकेच्या लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात झालं ते बहुळकर यांच्या सहकार्याने व त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीने बँक एका उंचीवर पोहोचली आहे.