25 सप्टेंबरपासून लागू होणार 46 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन? वाचा काय आहे सत्य.
25 सप्टेंबरपासून लागू होणार 46 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन? वाचा काय आहे सत्य
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 25 सप्टेंबरपासून 46 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचा मेसेज फिरत आहे.
नवी दिल्ली,बारामती वार्तापत्र रिपोर्ट
देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 50 लाखांच्या घरात जाण्याच्या मार्गावर आहे. आज एकाच दिवसात 83 हजार 809 नवीन रुग्ण सापडले. सरकारपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अफवांमुळे चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 25 सप्टेंबरपासून 46 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचा मेसेज फिरत आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) नावाने एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये 25 सप्टेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे नमूद होते. मात्र PIBने हा मेसेज फेक असल्याचे सांगितले आहे. तसेच. व्हायरल होत असलेले हे पत्र बनावट असल्याची माहिती दिली आहे.