तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील श्री.अशोक देवकर यांना बेसबॉल या खेळातील केलेल्या कार्याबद्दल देशसेवा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
२००५ पासून ते या महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील श्री.अशोक देवकर यांना बेसबॉल या खेळातील केलेल्या कार्याबद्दल देशसेवा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
२००५ पासून ते या महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील श्री.अशोक देवकर यांना भारत सेवा सोसायटी आणि भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त वेयल फाउंडेशन यांच्या सहकार्याने बेसबॉल या खेळातील आजवर केलेल्या कार्याबद्दल देशसेवा हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्री.अशोक देवकर यांना यापूर्वी जिल्हा क्रीडा कार्यालयाचा स्टार इंडिपेंडंट पुरस्कार गुणवंत क्रीडा शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.
त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत २१ व्या शतकातील शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीवर आधारलेल्या ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी त्यांची निवड झालेली आहे. २००५ पासून ते या महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी विशेष मार्गदर्शन करीत आहेत. त्याचप्रमाणे यापूर्वी राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून देखील कार्य केलेले आहे.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मा.मिलिंद शाह (वाघोलीकर) सर्व सन्माननीय सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले आहे.