स्थानिक

लॉकडाऊन च्या काळात पाणी बिले भरण्यासाठी गर्दी.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने ऑनलाइन सुविधा द्यावी नागरिकांची मागणी.

लॉकडाऊन च्या काळात पाणी बिले भरण्यासाठी गर्दी.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ने ऑनलाइन सुविधा द्यावी नागरिकांची मागणी.

बारामती:वार्तापत्र

बारामती शहर व तालुक्यात कडक लॉकडाऊन आहे त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडत नाही परंतु शहरातील सायली हिल या ठिकाणी कार्यालय असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी पाणी बिल भरण्यासाठी कार्यालय सुरू ठेवले आहे त्यामुळे अनेक नागरिक लॉक डाऊन असताना सुद्धा पाणी बिल भरण्यासाठी गर्दी करत आहेत नागरिक सोशल डिस्टन्स पाळत नाही,बिल भरताना व भरल्यानंतर त्यांना सॅनिटायझर दिले जात नाही तर काही नागरिक तोंडावर मास्क सुद्धा वापरत नसल्याचे निदर्शनात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉक डाऊन केले असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने ऑनलाइन सुविधा पाणी बिल भरण्यासाठी देणे आवश्यक असताना कार्यालय सुरू ठेवून एक प्रकारे गर्दी जमवत आहे व कोरोना चा अप्रत्यक्षपणे प्रसार करत असल्याचा आरोप उपस्तीत नागरिका मुकुंद शिंदे यांनी केला.
सर्व शासकीय कार्यालय आता बिल भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा देत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण का ऑनलाइन सुविधा देत नाही या बदल उपस्तीत अनेक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
पाणी बिल भरण्यासाठी जेव्हा लॉक डाऊन नसते तेव्हा रिक्षा किंवा इतर वाहनांनी यावे लागते त्यामुळे वेळ व प्रवास खर्च होतो आता तर लॉक डाऊन असल्याने पोलिसांना विनंती करून खाजगी वाहनाने पाणी बिल भरण्यास यावे लागले जर ऑनलाइन सुविधा असती तर घरातूनच बिल भरले असते अशी माहिती ज्येष्ठ नागरिक निवृत्त बँक अधिकारी महेश कुलकर्णी यांनी सांगितली.
बिल जर भरले नाही तर कनेक्शन कट केले जाईल या भीतीने नागरिक लॉकडाऊन असताना सुद्धा बिल भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दादा बेलदार यांनी सांगितले.तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने लवकरात लवकर ऑनलाइन बिल सुविधा सुरू करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत

लवकरच ऑनलाइन सुविधा सुरू करू: जीवन प्राधिकरण.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे अत्यावश्यक सेवेत येत असल्याने लॉक डाऊन च्या काळात आम्ही कार्यालय सुरू ठेवले आहे व इतर नवीन पाणी कनेक्शन देणे ,पाईपलाईन,मेन्टेन्स आदी कामे सुद्धा चालू आहेत त्यामुळे नागरिकांनी पाणी बिल भरण्यास नागरिकांनी यावे या बाबत जबरदस्ती नाही किंवा कोणतेही परिपत्रक नाही तरीही नागरिक स्वतः येत आहेत.
ऑनलाइन पाणी बिल भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालय कडे पाठपुरावा चालू आहे त्यास मंजुरी मिळाल्यावर ऑनलाइन सुविधा देऊ असे प्रशासन च्या वतीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!