स्थानिक
70 हजार रुपये किमतीचे गंठण बळजबरीने हिसकावून नेले.
बारामतीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने केले लंपास.
70 हजार रुपये किमतीचे गंठण बळजबरीने हिसकावून नेले.
बारामतीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने केले लंपास.
बारामती वार्तापत्र.
बारामती शहरातील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना शहरात घडली. सदर प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती शहरातील इंदापूर रोड लगत असणाऱ्या संघवी पार्क येथील किराणा दुकानात फिर्यादी महिला अगरबत्तिचा पुडा घेण्यास गेली होती. यावेळी दोन अनोळखी इसम तेथे आले. पैकी एकाने फिर्यादीच्या पाठीमागे येत दुकानातून चिक्की घेण्याचा बहाना करून 28 ग्रॅम वजनाचे 70 हजार रुपये किमतीचे गंठण बळजबरीने हिसकावून नेले.असे फिर्यादीत म्हटले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोसई गंपले करीत आहे.