राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून शिवाजीराजे घडले- हर्षवर्धन पाटील
जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती इंदापूर महाविद्यालयात साजरी
राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून शिवाजीराजे घडले- हर्षवर्धन पाटील
जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती इंदापूर महाविद्यालयात साजरी
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिवभक्त परिवार, इंदापूर आयोजित स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने( युवा दिन) इंदापूर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले.
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते जिजाऊ पूजन करण्यात आले यावेळी रोहिणी महादेव सोमवंशी, कांचन रविराज पवार आणि विजया मारुती मारकड यांचा तसेच माजी सैनिकांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. गेल्या सहा वर्षापासून हा उपक्रम महाविद्यालयामध्ये घेतला जातो. विद्यार्थी पालक व नागरिकांचा यामध्ये मोठा सहभाग असतो.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ राजमाता जिजाऊ यांनी आपल्या संस्कारातून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी राजे यांना घडविले. जीवन जगत असताना कसे संयमाने,संस्काराने जगले पाहिजे. आपल्या पिढीवर आणि समाजावर कसे धार्मिक आणि राजकीय संस्कार घडले पाहिजे असे अनेक पैलू राजमातेच्या जीवन कार्यामध्ये पहावयास मिळतात. छत्रपती शिवरायांवर पालकत्वाच्या माध्यमातून त्यांनी चांगले संस्कार घडविले. स्वराज्यस्थापनेचे स्वप्न राजमातेच्या शिक्षणातून शिवाजीमहाराजांना मिळाले.
आपल्या कर्तृत्वाने स्वामी विवेकानंद यांनी जगभर कार्य केले. युवाशक्ती बांधण्याचे, राष्ट्र निर्माण करण्याचे कार्य, राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचे कार्य स्वामी विवेकानंद यांच्या माध्यमातून झाले.’
डॉ. लक्ष्मण आसबे म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी आपल्या पिढीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य केले आहे. अनेक अडचणी असतानादेखील जिजाऊ यांनी आपल्या शूर पराक्रमाने मार्ग काढत स्वराज्य उभे करण्याचे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे ठेवले. आपल्या जीवनात कधीही नैराश्य येऊ नये यासाठी लढा हेच शिक्षण जिजाऊ यांनी आपल्या कार्यातून दिले आहे. मनगट आणि मन बळकट असेल तर आपण संकटातून मार्ग काढू शकतो. नवऱ्याच्या पुढे तलवार घेऊन पुढे जाणारी इतिहासातील पहिली स्त्री म्हणून जिजाऊंचा उल्लेख करावे लागेल. 5000 लोकांना घेऊन काही वर्षांपूर्वी राजगडावर हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली हा एक इतिहास निर्माण झाला आहे. आसबे यांनी अनेक ऐतिहासिक प्रसंग सांगून जिजाऊंचे कार्य सांगितले.’
यावेळी पंचायत समितीच्या सभापती स्वाती शेंडे,भाजपा तालुकाध्यक्ष शरद जामदार, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, संस्थेचे सचिव मुकुंद शहा,सहसचिव प्रा.बाळसाहेब खटके,नीरा भीमाचे साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार,संस्थेचे संचालक तुकाराम संस्थेचे खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, वाहतुक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, शकील सय्यद,आबासाहेब शिंगाडे,सुभाष काळे,माजी नगरसेवक गोरख शिंदे, शेखर पाटील,संजय मोरे, माजीदखान पठाण, सचिन मोरे,प्रशांत उंबरे, आदी मान्यवरांसह शिवभक्त परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली.