माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण
बारामती नगरपरिषदेद्वारा आणखी 10,000 झाडे लावण्याचे लक्ष आहे
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण
बारामती नगरपरिषदेद्वारा आणखी 10,000 झाडे लावण्याचे लक्ष आहे
बारामती वार्तापत्र
माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगर परिषदेकडून सौ. सुनेत्रवहिनी पवार. अध्यक्षा, एन्व्हायरमेंटलफोरम ऑफ इंडिया. यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. विनोद कुमार गुजर हाऊसिंग सोसायटी येथे 100 देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करणेत आली. वृक्षलागवडीनंतर उपस्थित सर्वांनी वसुंधरा रक्षणाप्रती आपली जबाबदारी म्हणून हरितशपथ घेतली. त्यानंतर बारामती शहरातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि बारामती नगर परिषदेच्या उद्यान विभागातील कर्मचारी यांना सौ. सुनेत्रावहिनी पवार यांनी तिळगुळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत बारामती नगरपरिषदेद्वारा आणखी 10,000 झाडे लावण्याचे लक्ष आहे. झाडांच्या सुरक्षेकरीता 1500 झाडांना बँक ऑफ बडोदा ने ट्री गार्ड उपलब्ध करून दिले आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानाची माहिती बारामती शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवण्याच्या सूचना सौ. सुनेत्रवहिनी पवार यांनी दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. किरणराज यादव यांनी केले. यावेळी बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. पौर्णिमा तावरे. उपाध्यक्षा तरन्नुम सय्य्द. माजी अध्यक्षा श्रीमती. भारतीताई मुथा आणि नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य. बारामतीचे प्रांताधिकारी श्री. दादासाहेब कांबळे. पोलिस उपअधिक्षक श्री. नारायण शिरगावकर. तहसिलदार श्री. विजय पाटील. बी. डी. ओ. श्री. राहुल काळभोर. पोलिस निरीक्षक श्री. नामदेव शिंदे. मा. उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक श्री. हनुमंत पाटील. विनोद कुमार गुजर हाऊसिंग सोसायटीतील सर्व नागरिक आणि एन्व्हायरमेंटलफोरम ऑफ इंडिया चे सदस्य यांची उपस्थिती होती.