गाडीला धक्का लागला म्हणून चित्रपट दिग्दर्शक,अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका व्यक्तीला मारली चापट…
महेश मांजरेकर यांनी दारु पिऊन आपल्याला चापट मारल्याची तक्रार तक्रारदाराने दिली आहे.

गाडीला धक्का लागला म्हणून चित्रपट दिग्दर्शक,अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका व्यक्तीला मारली चापट…
महेश मांजरेकर यांनी दारु पिऊन आपल्याला चापट मारल्याची तक्रार तक्रारदाराने दिली आहे.
बारामती वार्तापत्र
गाडीला धक्का लागला म्हणून अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी एका व्यक्तिला चापट मारली असल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
महेश मांजरेकर यांच्या गाडीला माझ्या गाडीचा पाठीमागून धक्का लागल्यावर मांजरेकर यांनी आपल्याला शिविगाळ करुन चापट मारली अशी तक्रार कैलास सातपुते यांनी पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानंतर महेश मांजरेकर यांच्यावर यवत पोलिस स्टेशनमधे अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महेश मांजरेकर यांनी दारु पिऊन आपल्याला चापट मारल्याची तक्रार तक्रारदाराने दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील तक्रारदार व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हि घटना शुक्रवारी रात्री 10.30 वाजता पुणे सोलापूर महामार्गावर घडली असल्याची माहिती आहे.
महेश मांजरेकर यांनी त्यांच्या कारला अचानक ब्रेक लावल्याने आपली कार त्यांच्या कारला पाठीमागून धडकली. त्यानंतर गाडीतून उतरुन महेश मांजरेकर यांनी तू दारु पिऊन गाडी चालवतोस का असं म्हणत त्यांनी अरेरावी करत आपल्याला चापट मारली असं तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं आहे.
याबाबत महेश मांजरेकर म्हणाले की, माझ्या गाडीला मागून त्यांनी धडक दिली. त्या गाडीत तिघे होते. त्यापैकी दोघांनी मद्यप्राशन केल्याचं भासत होतं. मी त्यांना उतरून या धडकेबद्दल जाब विचारला. घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करायची सोडून ते अरेरावीवर आले. मला चित्रिकरणाला उशीर होत होता म्हणून मी निघालो. या धडकेत माझ्या नव्या कोऱ्या मर्सिडीजचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी बोलवलं तर मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन, असं महेश मांजरेकर यांनी सांगितलं