बर्ड फ्लू रोगाबाबत

बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरीयाना, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत.

बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत .

बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरीयाना, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष होकारार्थी आले आहेत.

बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत

बारामती वार्तापत्र 

त्या संदर्भात विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या तसेच सोशल मिडीयावरुन बातम्या व माहिती प्रसारीत होत आहे. त्या अनुषंगाने माध्यमांना या बाबतीतील अद्ययावत अधिकृत माहिती देणेसाठी प्रस्तुत प्रेस नोट प्रसिध्दीस देण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात दि. १९.०१.२०२१ रोजी कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, यवतमाळ ३७००, पालघर १०६, सातारा २६,सोलापूर २, नाशिक ७, अहमदनगर २२, बीड १४५, नांदेड ९५, अमरावती ५०, नागपूर ९६ व वर्धा १०२ अशी कुक्कुट पक्षांमध्ये ४३५१एवढी मरतुक झालेली आहे.

बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई २, ठाणे ३८, पुणे १, जळगाव १,अहमदनगर १, नांदेड १, अमरावती १ व गोंदिया ४ अशी एकूण ४९ पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये विविध जिल्ह्यात मुंबई ५, ठाणे ५२, पालघर ३, रत्नागिरी ११, अहमदनगर २, बीड १, उस्मानाबाद १, अमरावती ३ व वर्धा १ अशा प्रकारे एकूण राज्यात ७९ मरतुक आढळून आली आहे.

महाराष्ट्र राज्यात दि. १९.०१.२०२१ रोजी एकूण ४४७९ पक्षांमध्ये मरतुक झाली आहे.सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

दि. ८/०१/२०२१ पासून आजतागायत एकूण १२,७५२ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
दि. १८.०१.२०२१ रोजी, पुर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था , भोपाळ येथून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कुक्कुट पक्षांमधील काही नमुने होकारार्थी आले असून त्यात मावंदा व रायता ता. कल्याण जि. ठाणे; मरीआईवाडी ता. लोणंद, जि. सातारा; वरवटी, ता. अंबेजोगाई, जि. बीड; दावणगाव, ता. रेणापूर, जि. लातूर; चिखली ता. कंधार व तलाहारी, ता.किनवट, जि. नांदेड; वारंगा, ता. हिंगणघाट, जि. नागपूर व गडचिरोली, अशा प्रकारे सात जिल्ह्यांतील कुक्कुट पक्षांचे नमुने बर्ड फ्लू साठी होकारार्थी आले आहेत.

कुक्कुट पक्षांमधील नमुनेही होकारार्थी आल्यानुसार, सदर क्षेत्रास “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. सात जिल्ह्यातील १४ ठिकाणी बर्ड फ्लूसाठी कुक्कुट पक्षी नमुने होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणाऱ्या सर्व २५२२९ कुक्कुट पक्ष्यांना, शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच या परिसरातील १०९१ अंडी आणि ४२१५ किलो कुक्कुट खाद्य देखील नष्ट करण्यात आले आहे.

तसेच वरील सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी कुक्कुट पक्षांव्यतीरिक्त इतर पक्षांमध्ये होकारार्थी निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, अशा ठिकाणी देखील सर्वेक्षणाचे काम चालू आहे. तसेच ज्या ठिकाणी सॅनिटायझेशन प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आले आहेत, अशा ठिकाणी १ ते १० कि.मी. क्षेत्रामधून कुक्कुट व इतर पक्षातील घशातील, विष्ठा आणि रक्तजल नमुने सर्वेक्षणासाठी घेण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाचे पथक डॉ. तपन कुमार साहू, क्वारंटाइन ऑफिसर, चेन्नई यांच्या नेतृत्वाखाली, दि. १७.०१.२०२१ पासून राज्यातील बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यासाठी राज्यात दाखल झाले आहे. या पथकाने राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. तसेच सदर पथकाने राज्यामध्ये पेण (रायगड), नांदे (पुणे), बेरीबेल (दौंड, पुणे) या ठिकाणी दिलेल्या भेटी दरम्यान तेथे केलेल्या रोग नियंत्रणाच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

आज दि. २०.०१.२०२१ रोजी सदरील केंद्राचे पथक बीड व परभणी येथील नियंत्रित क्षेत्रास भेटी देवून तेथील रोग नियंत्रणाच्या कार्यवाहीची पाहणी करतील. बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना दि.१२.०१.२०२१ नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत.

कुक्कुट पक्षांमध्ये मरतुक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करून, आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत.

या संदर्भात सर्व पोल्ट्री धारक तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणा-या पक्षांमध्ये मर्तृक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मर्तृक झाल्याचे निदर्शनास आल्यास , तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी.

तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ च्या कलम ४(१) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती शासनेतर संस्था,सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा-या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास, त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात काळविणे बंधनकारक आहे.

ज्या ठिकाणी बर्ड फ्लू चा उद्रेक झालेला आहे, त्याच ठिकाणी रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी वरील प्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे.
,
पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाण्यास धोका नाही. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यांत येऊ नयेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram