टी-20 सामन्यात शिरूरच्या संघाकडून दहा गडी राखून पुण्याचा पराभव
बारामती मध्ये 28 जानेवारी पासून महिलांचे टी-20 सामने

टी-20 सामन्यात शिरूरच्या संघाकडून दहा गडी राखून पुण्याचा पराभव
बारामती मध्ये 28 जानेवारी पासून महिलांचे टी-20 सामने
बारामती वार्तापत्र
येथील धीरज जाधव क्रिकेट अकादमीच्या वतीने सोळा वर्षाखालील खेळाडूंचा टी-20 सामन्यात शिरूरच्या संघाने पुण्याच्या संघाचा दहा गडी राखून पराभव केला. शिरूर चा अष्टपैलू खेळाडू सम्यक जगताप याने 20 चेंडूत 50 धावा काढत चार षटकांत 4 धावांच्या मोबदल्यात पुण्याच्या तीन फलंदाजांना आउट केले.
या स्पर्धेमध्ये पुणे-मुंबई शिरूर सातारा सांगली पंढरपूर नगर या ठिकाणच्या संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये शिरूर चा सम्यक जगताप धुळ्याचा सचिन धस संगमनेरचा अनिकेत कवडे अकलूजचा अमित निंबाळकर यांनी जबरदस्त कामगिरी केली .अंतिम सामन्यात शिरूर ने पुण्यावर दहा गडी राखून पाच षटकात विजय मिळवला.
या अकादमीच्या वतीने येत्या 28 जानेवारीपासून बारामतीत महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे ही संधी 1971 नंतर पहिल्यांदाच बारामतीत आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती धीरज जाधव यांनी दिली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर 28 ते 4 फेब्रुवारी दरम्यान हे सामने होतील. लेदर बॉल वर होणाऱ्या या सामन्यांमध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरीलही संघ सहभागी होणार आहेत तसेच बारामतीतुनहि महिलांचा एक स्थानिक संघ या स्पर्धेत असणार आहे भारतीय क्रिकेट संघात खेळलेल्या अनुजा पाटील व पूनम राऊत या दोघी या सामन्यात खेळतील