सहकारी संस्था, बचत गट , ग्रामपंचायत करणार वीज बिल वसुली ,,,महावितरण’ने दिले अधिकार,
थक बाकीच्या 30 टक्के कमावण्याची संधी
सहकारी संस्था, बचत गट , ग्रामपंचायत करणार वीज बिल वसुली ,,,महावितरण’ने दिले अधिकार,
थक बाकीच्या 30 टक्के कमावण्याची संधी
बारामती वार्तापत्र
राज्याच्या वीज वितरण कंपनीची सद्यस्थिती वाढती थकबाकी, लॉक डाऊन मध्ये ग्राहकांची वाढलेले थकबाकी लोकांची विज बिल भरणे विषयी ची वाढती अनास्था लक्षात घेता महावितरणने आता चांगली शक्कल लढवली दिसते. यामध्ये साखर कारखाने ,महिला बचत गट, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून वसुली होणार आहे .
महावितरणच्या या निर्णयामुळे अपुरे असणारे मनुष्यबळावर महावितरण वसुली सह ग्राहकांच्या तक्रारींकडे ही लक्ष द्यायला कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नव्हता. त्यात वसुलीची जबाबदारी प्रत्येक वायरमन यांच्याकडे दिलेली होती त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यावर मर्यादा येत होत्या त्यामुळे आता महावितरण’ने घेतलेल्या निर्णयामुळे ग्राहकांनाही कर्मचारी चांगल्या प्रतीची सेवा देतील तसेच महावितरणची ही कारखान्याच्या माध्यमातून वसुली उत्तम रित्या वाढेल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. तसा धोरणात्मक निर्णय महावितरणने घेतला आहे .
ज्या संस्थांना केवळ कृषी वीजबिल वसुलीचे अधिकार आहेत त्या संस्था प्रती पावती मागे पाच रुपये त्यांना मिळतील या संस्थांची नोंदणी महावितरण’च्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मदतीने पोर्टल द्वारे होईल संगणकीय प्रणालीद्वारे या संस्थांना कलेक्शन सेंटर कोड मिळेल ग्रामपंचायत वगळता इतर संस्थांना बिल भरणा केंद्र केंद्र मंजुरीनंतर महा पॉवर पे या वॉलेट व्दारे ग्राहकांचा बिल भरणा होईल .सरासरी वीज बिल भरण्याच्या तीन दिवसा इतकी रक्कम अनामत म्हणून घेतली जाणार आहे. अनामत रक्कम दरमहा सुधारित केले जाईल.
यामुळे प्रति वीज बिल पावती मागे पाच रुपये संबंधित संस्थांना मिळतील तर शेतकरी सहकारी संस्था व साखर कारखान्यांनी वसूल केलेल्या कृषी थकबाकी रकमेवर दहा टक्के प्रोत्साहन रक्कम म्हणून देण्यात येईल उर्वरित संस्थांनी कृषी थकबाकी स्वीकारल्यास भरणा केलेल्या रकमेच्या 30 टक्के आणि चालू कृषी वीज बिलाचा भरणा केल्यास 20 टक्के प्रोत्साहन मोबदला मिळणार आहे हे सर्व पाऊल जरी महावितरण’ने उचलले असले तरी ग्राहकांचा यात कितपत प्रतिसाद मिळतो यावर या योजनेचे यश अवलंबून आहे मात्र ग्राहकांनी यामध्ये एक पाऊल पुढे टाकत कारखान्यांकडून होणाऱ्या वसुलीला पाठिंबा द्यावा म्हणजे महावितरण’ला ही ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी व आपले आर्थिक डबघाईला गेलेली प्रगती साधता येईल.