स्थानिक
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत बारामती शहरात वायुगुणवत्ता परिक्षणास सुरवात
बारामती शहराची वायु गुणवत्ता तपासणी करीता
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत बारामती शहरात वायुगुणवत्ता परिक्षणास सुरवात
बारामती शहराची वायु गुणवत्ता तपासणी करीता
बारामती वार्तापत्र
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग,महाराष्ट्र शासन यांचे द्वारा निसर्गाशी आसलेली कटीबध्दता निश्चित करण्यासाठी पृथ्वी,वायू,जल अग्नि आणि आकाश या पंचतत्वांवर आधारीत ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यातील वायु या घटकाचे संरक्षण करता यावे या करिता बारामती शहराची वायु गुणवत्ता तपासणी करीता बारामती शहरात रहिवासी क्षेत्र (सहयोग सोसायटी), वाणिज्यिक क्षेत्र (बारामती शहर बसस्थानक) तसेच औद्योगिक क्षेत्र (एम आय डी सी) या ठिकाणी दिनांक २१/१/२०२१ सांयकाळ पासून दिनांक २२/१/२०२१ पर्यंत सलग २४ तास वायु गुणवत्ता परिक्षण करण्यात येत आहे.