स्थानिक

बारामती तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत जाहीर

बारामती तालुक्यात एकूण 99 ग्रामपंचायती आहेत

बारामती तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत जाहीर

बारामती तालुक्यात एकूण 99 ग्रामपंचायती आहेत

बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील 2020 ते 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत कार्यक्रम तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कविवर्य मोरोपंत नाट्यगृह, बारामती येथे संपन्न झाला.

यावेळी निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव व तहसिल कार्यालयातील कर्मचारी , लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्वप्रथम तहसिलदार पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून आसन ग्रहण करावे अशी सूचना केली.

यानंतर पाटील म्हणाले की, बारामती तालुक्यात एकूण 99 ग्रामपंचायती आहेत.

या ग्रामपंचायतीमध्ये अनूसूचित जातीसाठी 15 पदे, अनूसुचित जमातीसाठी 1 पद, नागरिकांच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील 27 पदे, आणि सर्वसाधरण मध्ये 56 पदांची सोडत जाहिर करण्यात येणार आहे.

यामध्ये महिलांसाठी पन्नास टक्के प्रमाणे अनुसूचित जातीची 8 , अनुसूचित जमातीचे 1, नागरिकांचा इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारणसाठी 28 पदांची सोडत करून आरक्षण जाहिर करण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी यापूर्वी आठ डिसेंबर रोजी जाहिर झालेल्या सोडतीतील आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

सरपंच पदाची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायती :- भिलारवाडी, कन्हेरी, काटेवाडी, निरावागज, कोऱ्हाळे खुर्द , गुनवडी, कोळोली व गोजूबावी .

अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षित ग्रामपंचयती:- मुढाळे, करंजे, मळद ,कटफळ, पणदरे, निंबोडी व शिरवली .
अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ग्रामपंचायत :- निंबूत
नागरिकांचा इतर मागासप्रवर्गातील स्त्रीयांसाठी आरक्षित ग्रामपंचायती :-पिपंळी, पारवडी, उंडवडे सुपे, गडदरवाडी, सावळ, मुर्टी, कारखेल, जळगाव सुपे, काळखैरेवाडी, थोपटेवाडी, ढेकळवाडी, डोर्लेवाडी, काऱ्हाटी व साबळेवाडी.

नागरिकांचा इतर मागासप्रवर्गातील आरक्षित ग्रामपंचायती :- सस्तेवाडी , खराडेवाडी, मुरूम, बाबुर्डी, वंजारवाडी, नारोळी, वाकी, धुमाळवाडी, जैनकवाडी, सोनवडी सुपे, कांबळेश्वर, कऱ्हावागज व वडगाव निंबाळकर.

सरपंच पद सर्वसाधारण स्त्री प्रवर्ग ग्रामपंचायतीची नावे :- लोणीभापकर, सोरटेवाडी, कुतवळवाडी, सोनगाव, माळवाडी लाटे, पवईमाळ, आंबी बुद्रुक, अंजनगाव, शिर्सुफळ, खांडज, चोपडज, उंडवडी क.प, देऊळगाव रसाळ, करंजेपूल, वाणेवाडी, सोनकसवाडी, कुरणेवाडी, मोरगाव, भोंडवेवाडी, मोराळवाडी, सदोबाचीवाडी, आंबी खुर्द, पळशीवाडी, मगरवाडी, माळवाडी लोणी, पानसरेवाडी, गाडीखेल व माळेगाव बु.

खुला सर्वसाधारण ग्रामपंचायती नावे :- कोऱ्हाळे बु. , जोगवडी , लाटे, मेडद, मेखळी, जळगाव क.प, सुपा, वाघळवाडी, माळेगाव खुर्द, पाहुणेवाडी, बऱ्हाणपूर , झारगडवाडी, सांगवी, मानप्पावस्ती, शिरष्णे, ढाकाळे, चांदगुडेवाडी, सायबांचीवाडी, मासाळवाडी, तरडोली, वढाणे, चौधरवाडी, मोढवे, खंडोबाचीवाडी, घाडगेवाडी, दंडवाडी, जराडवाडी ‍ व होळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram