दौंड

दौंड : तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत

आरक्षण सोडत हे लहान मुलांकडून चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले

दौंड : तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत

आरक्षण सोडत हे लहान मुलांकडून चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले

दौंड : बारामती वार्तापत्र

दौंड : तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत आज शुक्रवारी ( दि.29 ) दौंड शहरातील राज्य राखीव गटाच्या मंगलमुर्ती सभागृहात पार पडली.

यामध्ये अनुसुचित जमातीसाठी दोन गावे त्यामध्ये एक महिला राखीव तर अनुसुचित जातीसाठी बारा गावे यामध्ये सहा अनुसुचित महिलांसाठी राखीव, तसेच नागरीकांचा इतर मागास प्रवर्ग (ओबीसी ) साठी 21 गावे यामध्ये 11 जागा नागरीकांचा इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव करण्यात आल्या तर खुला प्रवर्गासाठी 45 गावे यामध्ये महिलासांठी 23 गावे राखीव करण्यात आली. यातील महिला राखीव व नागरीकांचा मागास प्रवर्गासाठीच्या काही गावांमधील ग्रामपंचायतचे आरक्षण सोडत हे लहान मुलांकडून चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले. दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी ही आरक्षण सोडत जाहीर केली.

तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीचे जाती निहाय प्रवर्गासाठीचे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झालेली गावे पुढील प्रमाणे.

अनुसुचित जमाती – राजेगाव, अनुसुचित जमाती महिला – पाटेठाण, अनुसूचित जाती महिला राखीव – वडगाव दरेकर, पडवी, खोर, दहिटणे, बिरोबाचीवाडी, जिरेगाव तर अनुसूचित जाती – कानगाव, कोरेगाव भिवर. पांढरेवाडी, नायगाव, कुरकुंभ, वाखारी,

नागरिकांचा इतर मागासवर्ग प्रवर्ग 21 जागा पैकी 11 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. या पुढील प्रमाणे – बोरीभडक, गोपाळवाडी, लोणारवाडी, खुटबाव, मळद, शिरापूर , राहु, गार, रोटी, पेडगाव, नानगाव.

नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण – एकेरीवाडी, गिरिम, हिंगणीबेर्डी, कडेठाण, खोपोडी, पेडगाव, नानविज, पिलानवाडी, टेळेवाडी, आलेगाव, खामगाव.

खुला प्रवर्गासाठी 45 ग्रामपंचायत यापैकी महिलांसाठी 23 गावे आरक्षित करण्यात आले यामध्ये भरतगाव ,चिंचोली ,देवकरवाडी, कासुर्डी, कौठडी, कुसेगाव, खानोटा, मलठण, नंदादेवी, पाटस, पिंपळगाव, पानवली, रावणगाव, सहजपूर, ताम्हाणवाडी ,वाटलुज, वासुंदे, वरवंड, केडगाव, खडकी, लडकतवाडी, वाळकी, हिंगणीगाडा ही गावे सर्वसाधारण महिला राखीव करण्यात आली.

खुला प्रवर्ग असणारी गावे – बोरीपार्धी, बोरीबेल, भांडगाव, डाळिंब, दापोडी, देलवडी, देऊळगाव गाडा, देऊळगाव राजे ,गलांडवाडी, हातवळण, लिंगाळी, मिरवडी, टाकळी, नांदूर, नाथाचीवाडी, पारगाव, सोनवडी, यवत , वडगावभांडे, बोरीऎंदी, खोरवडी, सोनवडी, उंडवडी.

यावेळी निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे, सहाय्यक निवडणुक अधिकारी माने तसेच तालुक्यातील ग्रामपंचातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!