एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
जिल्ह्यात 11 लाख 32 हजार 351 बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट्य
एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
जिल्ह्यात 11 लाख 32 हजार 351 बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट्य
बारामती वार्तापत्र
पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू असून एकही बालक लसीकरणापसून वंचित राहू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती महिला रुग्णालयात बालकांना पोलिओ डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ झाला.
पुणे जिल्हयात मोहिमेत सुमारे 11 लाख 32 हजार 351 बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आज जिल्ह्यात 6 हजार 700 बुथवर लसीकरण करण्यात येत आहे. 6 हजार 254 टीमच्या मदतीने गृहभेटी देत लसीकरण करण्यात येणार आहेत.
यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.चेतन खाडे, डॉ. शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, बारामती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी यावेळी उपस्थित होते.
0000