सक्तीने वीजबील वसुली होत असल्याच्या निषेधार्थ इंदापूर महावितरण समोर भाजपाचे आंदोलन
आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग
सक्तीने वीजबील वसुली होत असल्याच्या निषेधार्थ इंदापूर महावितरण समोर भाजपाचे आंदोलन
आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग
इंदापूर : प्रतिनिधी
सक्तीने वीजबील वसुली होत असल्याबाबत व शेती पंपाच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ इंदापूर महावितरण कार्यालयासमोर भाजपा व मित्र पक्षाच्या वतीने आज (दि.१) रोजी आंदोलन करण्यात आले.
सध्या थकीत वीजबिल ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याचे काम सुरू असल्याने शेतकरी, नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज तोडणी मोहीम थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपने केली असून इंदापूर येथे याच विषयाच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले.
आंदोलन प्रसंगी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यासंदर्भात महावितरणचे उपअभियंता किरण गोफणे व महसूल अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, आरपीआयचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजी मखरे,नगरसेवक कैलास कदम,राजकुमार जठार,राम आसबे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संदीपान कडवळे,भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद,मा.सभापती पिंटू काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील,आरपीआय चे शहराध्यक्ष अमोल मिसाळ,माऊली चवरे,अमोल इंगळे,मंगेश पाटील,युवराज मस्के,ललेंद्र शिंदे, व इतर कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.