खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत अजूनही एकत्र येत नाहीत?
बारामतीत त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांवर आज सुनावणी

खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत अजूनही एकत्र येत नाहीत?
बारामतीत त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांवर आज सुनावणी
बारामती वार्तापत्र
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा.खासदार राजू शेट्टी व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बारामतीला पायी चालत येऊन आंदोलनास बसले होते. पिकाला चांगला दर मिळावा म्हणून हे आंदोलन होते .त्या आंदोलना दरम्यान त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते या गुन्ह्यांची सुनावणी आज बारामतीत होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन दोघांनी वेगवेगळे मार्ग अवलंबले त्यातून सदाभाऊ खोत स्वाभिमानी तून बाहेर पडले व त्यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी त जायचं नाही असं ठरवलं.
मात्र ज्या संघटनेमुळे आपल्याला भाजपकडून कृषिमंत्री हे पद मिळालं त्या संघटनेकडे सदाभाऊ अजूनही वेगळ्या नजरेने पाहतात की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.
कारण आज बारामतीत झालेल्या सुनावणीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सकाळी न्यायालयासमोर हजर राहिले. तर राजू शेट्टी दुपारनंतर, दोघांनीही एकाच वेळी हजर राहिला पाहिजे होत अशी चर्चा रंगली होती त्यामुळे ही जोडगोळी अजूनही एकत्र येत नसल्याचे दिसून येत आहे.