शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात बारामती मध्ये आंदोलन;रिक्षा दोरीने ओढून निषेध व्यक्त
दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी
शिवसेनेचे इंधन दरवाढी विरोधात बारामती मध्ये आंदोलन;रिक्षा दोरीने ओढून निषेध व्यक्त
दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी
बारामती वार्तापत्र
शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार बारामतीत आज शिवसैनिकांनी इंधन दरवाढीविरुध्द आंदोलन केले. पुणे जिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल डिझेल दरवाढीचा आज निषेध नोंदविण्यात आला.
शहरातील भिगवण चौकात रिक्षाला दोरी बांधून शिवसैनिकांनी ही दोरी ओढत निषेध नोंदविला. ही दरवाढ सामान्य माणसाला परवडणारी नसून यामुळे महागाई पुन्हा वाढणार असल्याने तातडीने ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी बाळासाहेब शिंदे, राजेंद्र पिंगळे, विश्वास मांढरे, पप्पू माने, नीलेश मदने, सुदाम गायकवाड, दत्ता लोणकर, रंगनाथ निकम, शौकत बागवान, सुदर्शन रणवरे, सतीश काटे, रमेश खलाटे, राजेंद्र साळुंखे, उमेश दुबे, गोकुळ रेडे, राजेंद्र गलांडे, संतोष सातपुते, अविनाश कदम, गजानन रायते, दादा दळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते.