इंदापूर क्रीडा विभागाकडून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन;विविध प्रशासकीय विभागातील संघ सहभागी
क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात सुरू
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2021/02/IMG-20210207-WA0050-780x462.jpg)
इंदापूर क्रीडा विभागाकडून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन;विविध प्रशासकीय विभागातील संघ सहभागी
क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात सुरू
इंदापूर : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या ताणतणावातून मोकळीक व विरंगुळा म्हणून तसेच अधिकारी-कर्मचारी एकत्र करून सांघिक भावना वाढीच्या अनुषंगाने प्रशासकीय चषकाचे आयोजन इंदापूर तालुका क्रीडा विभागाकडून करण्यात आले असून आज (दि.७) रोजी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
विविध सरकारी आस्थापनेतील सरकारी अधिकारी, कर्मचारी,जवळपास वर्षभरापासून कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या उपाय योजना व जनतेच्या सेवेकरिता सेवा देत आहेत,तसेच पत्रकार देखील या महाभयंकर परिस्थितीत न डगमगता प्रत्येक बातमी घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची शारीरिक व मानसिक क्षमता सक्षम करण्याकरिता व आरोग्याच्या दृष्टिकोनातून थकवा ताण नाहीसा करण्यासाठी सदरील स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा विभागाने केले आहे.
सदरील क्रिकेट स्पर्धा इंदापूर तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी खेळवली जात असून या स्पर्धेत जि. प शिक्षक, आरोग्य विभाग,पत्रकार,पोलीस प्रशासन, संगणक विभाग, ग्रामसेवक, सरकारी डॉक्टर, पंचायत समिती, नगरपालिका,कृषी विभाग, महसूल विभाग,क्रीडा विभाग,असे संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या संघास फिरता चषक प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान आज दिवसभरात पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात पत्रकार संघातील खेळाडूंनी सांघिक खेळ दाखवत सलग दोन्ही सामने जिंकत आपला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.