सावधान ! रुग्ण संख्या वाढतेय बारामतीत आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९
थांबलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय रुग्णांची वाढती संख्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी मात्र शहरातील संख्या वाढलेलीच
सावधान ! रुग्ण संख्या वाढतेय बारामतीत आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९
थांबलेला कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय रुग्णांची वाढती संख्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ग्रामीण भागात रुग्ण संख्या कमी मात्र शहरातील संख्या वाढलेलीच
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या १९ झाली आहे.
शासकीय rt-pcr १२२ नमुन्यामधून ९ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण १८ rt-pcr रुग्णांपैकी ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या २१ नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह ४ रुग्ण आहे.
बारामती तालुक्यात काल झालेल्या रुग्णांमध्ये अवचट इस्टेट येथील ६७ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील ३१ वर्षीय महिला, प्रगती नगर येथील ४९ वर्षे पुरुष, जळोची येथील तीस वर्षे पुरुष, कांबळेश्वर ५८ वर्षे पुरुष, झारगडवाडी येथील ३२ वर्षे पुरुष, सूर्यनगरी येथील वीस वर्षीय महिला, एमआयडीसी येथील ३९ वर्षीय महिला , देसाई इस्टेट येथील ३५ वर्षीय महिला, वाकी येथील ६२ वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील २४ वर्षीय पुरुष, रुई येथील १७ वर्षीय युवक, बारामती शहरातील ४२ वर्षीय पुरुष, संघवीनगर येथील ५२ वर्षीय महिला, रुई येथील ६० वर्षीय महिला, सोनगाव येथील २६ वर्षीय पुरुष, कसबा येथील तीस वर्षे पुरुष यांचा समावेश आहे.
शहरातील १५ तर ग्रामीण भागातील ४ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या ६४३७ आहे तर बरे झालेले रुग्ण ६१९६ व एकूण मृत्यु १४५ इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा