सोनकसवाडीत तीन घरांवर सशस्त्र दरोडा
साडेचार लाखांचा ऐवज चोरीला
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सोनकसवाडी येथे गुरुवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास सहा अज्ञात आरोपींनी सशस्त्र दरोडा टाकून तीन घरातून साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सहा दरोडेखोरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रुपेश हनुमंत लोखंडे यांनी याविषयीची फिर्याद दिली की गुरुवारी पहाटे पावणे एकच्या सुमारास हा प्रकार घडला साधारण 20 ते 25 वयोगटातील सहा जण लोखंडे यांच्या घरात घुसले त्यामधील दोघेजण बाहेर थांबून बाकीचे आत येऊन सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला त्यामध्ये 86 हजार रुपयांची रोख रक्कम होते
तसेच त्यांच्या शेजारील विजय लोखंडे यांच्या घरावरही दरोडा टाकून चोरट्यांनी 50 हजार रुपयांचा सोन्याचा गंठण चोरून नेला
चोरीस गेला माल खालील प्रमाणे-
86,000-00 रोख रक्कम त्यात 500/- रू दराच्या 170 नोटा, 100रू.दाराच्या 10 नोटा,
70,000-00 तीन मनीमंगळसुत्र प्रत्येकी आर्घा तोळे वजानाचे, जु वा कि अं,
5000-00 दोन सोन्याचे बदाम, जु वा कि अं,
1000-00 एक चांदीचे ब्रॅसेलट, जु वा कि अं,
1000-00 दोन चांदीचे पैजण जोड, जु वा कि अं,
3000-00 एक सॅमसग कंपनीचा अ 31,मोबाईल जु वा कि अं,
3000-00 एक सॅमसग कंपनीचा अ 10,मोबाईल जु वा कि अं,
47,000-00 एक तोळा वजानाचे सोन्याचे गंठन (विजय साधु लोखंडे याचे) जु वा कि अं एकूण 2,16,000-00,
हकिगत – वर नमुद केले तारीख वेऴी ठिकाणी अनोळखी 06 इसमांनी फिर्यादी यांचे घराचा बंद दरवाजा कशाने तरी उघडून व त्यातील चार अनोळखी इसम वय अंदाचे 20ते 25 वयोगटातील अंगात शर्ट व पँन्ट घातलेले असे घराचे आत येवुन व घराचे बाहेर दोन इसम थांबुन घरात आलेल्या एका इसमाने चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीस तुझे घरातील जे काय आहे ते काढुन दे असे म्हणुन फिर्यादीचे जवळील 86,000रूपये रोख रक्कम व घरातील सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल फोन असाएकुण 1,69,000हजाराचा किंमतीचा माल जबदस्तीने चोरी करून घेऊन गेले आहेत. तसेच फिर्यादीचे शेताचे शेजारी राहणारे भावकीतील विजय साधु लोखंडे यांचे 47,000/- रुपये किमतीचा सोन्याचा गठंण चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने चोरून घेऊन गेले .वगैरे मजकुर चे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला असुन ,गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा.कोर्टात रवाना केला आहे.
या दोन चोरी केल्यानंतर त्यांनी गावातील गायकवाड मळ्यात असणारे अशोक गायकवाड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून पंधरा हजाराची रोकड व दोन लाख 13 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले याप्रकरणी रोहन अशोक गायकवाड यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस करीत आहेत.