काटेवाडीत उसाच्या शेतात आढळला महिलेचा सांगडा
परिसरात खळबळ
बारामती वार्तापत्र
काटेवाडी तालुका बारामती येथे ओढ्या नजीक एका उसाच्या फडाची तोड चालू होती या उसाच्या फडात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
काटेवाडी येथील अभीजीत ठोंबरे यांच्या उसाच्या फडाला तोड सुरू होती यादरम्यान ऊसतोड मजुरांना या फडात महिलेची कवटी ,हाडे आणि साडी असल्याचे दिसले. त्यामुळे मजूर भयभीत झाले व त्यांनी अभिजीत ठोंबरे यांना याची कल्पना दिली ठोंबरे यांनी लागलीच बारामती तालुका पोलिस स्टेशनशी संपर्क साधला
पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी या ठिकाणची सर्व परिस्थिती पाहिली घटनेचा पंचनामा केला.
या सांगाड्यावर शिंपले असलेले पिवळे धातूचे मनी मंगळसूत्र त्यात काळे मणी ,काचेचे हिरव्या बांगड्या व एका हातात रुमाल व त्या रुमालात शंभर रुपयाच्या दोन नोटा , पांढरी स्लीपर साडी अशा स्वरूपात हा सांगाडा आढळला या प्रेताचा सांगाडावरील संपूर्ण मांस झडून गेलेले व मणक्याचे ,हातापायाचे हाडाचे सुट्टे भाग अशा स्वरूपात हा सांगाडा आहे.
हा सांगाडा पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला असुन हा मृतदेह अंदाजे सहा ते सात महिन्यापूर्वी चा असावा असा पोलिसांचा अंदाज आहे पुढील तपास बारामती तालुका पोलिस स्टेशन करत आहे.