तालुक्यातील १५५ कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, दर्जेदार कामे करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पाटण तालुक्यातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन ई-भूमिपूजन
तालुक्यातील १५५ कामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, दर्जेदार कामे करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पाटण तालुक्यातील विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन ई-भूमिपूजन
सातारा, बारामती वार्तापत्र रिपोर्ट
पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून ही कामे दर्जेदार करुन पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
पाटण मतदार संघातील ग्रामीण डोंगरी भागात सन 2020-21 या आर्थिक वर्षात मंजूर विविध विकासकामांचे ऑनलाईन ई- भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह, शिवदौलत सह.बॅक,मल्हार पेठ येथून गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
155 कामांमध्ये रस्ते, मागासवर्गीय मुलांसाठी अभ्यासिका यासह विविध विकास कामे हाती घेतलीआहेत. ही कामे दर्जेदार करावीत. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, महाराजांनी या मराठी माणसाला जिद्द व प्रेरणा दिली आहे. त्या जिद्दीच्या आणि प्रेरणेच्या जोरावर महाराष्ट्राने अनेक संकटावर मात केली आहे. आताही कोरोनाचे सकंट महाराष्ट्रावर आहे, या संकटासाठी आपला लढा यापुढेही सुरु राहील या लढ्यामध्ये नागरिकांनी स्वत:ला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता याची शिस्त लावली पाहिजे. कोरोनाचे संकट असतानाही पाटण मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत आहोत. आज रात्रंदिवस आपण मेहनत घेत आहोत या मेहनतीला यश मिळेल अशी प्रार्थना करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शेवटी सर्वांना शुभेच्छा दिल्या
80 टक्के पाटण मतदार संघ डोंगरी आहे. 155 कामांमध्ये रस्ते, वाड्यावस्त्यांवरील अंतर्गत रस्ते, गावे-वाड्यांना जोणारे मोठे रस्ते तसेच जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजना (विशेष घटक) योजनेंतर्गत मासवर्गीय वस्त्यांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थींना अभ्यासाकरिता अद्ययावत अभ्यासिका बांधण्याबरोबरच विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा असून या जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक निधी द्यावा, अशी मागणीही गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी ऑनलाईन ई-भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.