कोरोंना विशेष

बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २९

शहरी भागात रुग्णसंख्येचा आलेख वाढताच

बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या २९

शहरी भागात रुग्णसंख्येचा आलेख वाढताच

बारामती वार्तापत्र
संपूर्ण राज्यातील अनेक ठिकाणी कोरोणाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. बारामतीतही आज २९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बारामती शहरात २० आणि बारामती ग्रामीण मध्ये ९ रुग्णसंख्या झालेली आहे.

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये ६९ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ८ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४२ नमुन्यांपैकी १८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या १९ नमुन्यांपैकी एकूण ३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २९ झाली आहे.

बारामतीत काल शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३९ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, काटेवाडी येथील ६० वर्षीय महिला, निंबुत येथील २३ वर्षीय महिला, महावीर भवन येथील ३२ वर्षीय पुरुष, गुणवडी येथील ४२ वर्षे महिला, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारील ३९ वर्षे पुरुष, पारवडी येथील ५८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.

बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये फलटण रोड कसबा येथील ४५ वर्षीय पुरुष, गवळी अपार्टमेंट शॉप पेट्रोल पंप शेजारील ६२ वर्षीय महिला, वीस वर्षीय महिला, ३९ वर्षीय महिला, अनुग्रह बंगला घारे इस्टेट तपोवन कॉलनी येथील ६१ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, माळेगाव येथील ३२ वर्षीय महिला, निरावागज येथील ३४ वर्षीय पुरुष, सांगवी येथील ३६ वर्षीय महिला, माऊली निवास जिजामाता नगर येथील ३३ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.

कॅनोल रोड सुयोजन अपार्टमेंट येथील ५० वर्षीय महिला, एचपी गॅस गोडाऊन पतंग शहा नगर शेजारील ४० वर्षीय महिला, महालक्ष्मीला एमायडिसी रोड येथील २८ वर्षे पुरुष, मॅजिक ग्रीन सिटी खंडोबानगर येथील ३५ वर्षीय महिला, सहयोग सोसायटी भिगवण रोड शेजारील २९ वर्षीय पुरुष, अशोक नगर सिद्धिविनायक पावर येथील ५३ वर्षीय पुरुष, कॉलनी येथील ४३ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, बुरुडगल्ली येथील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ६८२० तर एकूण बरे झालेले रुग्ण ६३४९ एकूण मृत्यू १४६.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button