वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर नगरपरिषदेने घेतली आढावा बैठक
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर नगरपरिषदेने घेतली आढावा बैठक
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
इंदापूर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस वाढू लागलेली कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या व कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यावरील उपाय योजना संदर्भात भार्गवराव बगीच्या या ठिकाणी आज (दि.१) रोजी इंदापूर नगर परिषदेकडून आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी इंदापूर शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून इंदापूर शहरातील नागरिकांनी मास्कचा वापर करण्याबरोबरच सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.तसेच वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर चा वापर करणे,गर्दी टाळणे याबाबत सूचना केल्या.
यावेळी बोलताना नायब तहसीलदार अनिल ठोंबरे म्हणाले की, मंडई व बाजारात पालेभाज्या व फळे विक्रेते यांनी गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवूनच त्यांची विक्री करावी.सर्व नागरिकांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कारवाई केली जाईल. याच बरोबर इंदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी जे नागरिक मास्क न लावता घराच्या बाहेर पडून नियमांचे उल्लंघन करतील अशांवर कारवाईसाठी इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांबरोबर इंदापूर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल असे सांगितले. तसेच आज (दि.१) पासून शहरातील जेष्ठ नागरिकांना व कोमॉरबीड ( सह व्याधी ) रुग्ण यांना लस देण्याचे काम चालू करण्यात आले असल्याचे सांगत सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे यांनी केले.
यावेळी नगरसेवक भरत शहा,उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, नगरसेविका मीना मोमीन,नगरसेवक जावेद शेख,नगरसेवक प्रशांत शिताप,रमेश धोत्रे, इंदापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर, गजानन पुंडे, सहदेव व्यवहारे यांसह इतर अधिकारी,कर्मचारी वर्ग उपस्थित होता.