स्थानिक

बारामतीत एकावर तलवारीने वार

रागात का बघतो विचारलेने घडली घटना

बारामतीत एकावर तलवारीने वार

रागात का बघतो विचारलेने घडली घटना

बारामती वार्तापत्र
रागात पाहिल्याने रागात का पाहतो असे विचारले असता एकाने शिवीगाळ करत डोक्यात तलवारीने वार केल्याची घटना आज बारामती येथे घडली.

नितीन पांडुरंग राऊत, वय 35 वर्ष रा. तांदुळवाडी, तालुका बारामती ,जिल्हा पुणे हे सकाळी कामावर जात असताना आरोपी आशिष उर्फ बबलू कदम राहणार तांदुळवाडी, बारामती याने राऊत यांच्याकडे रागाने पाहून शिवीगाळ केली. राऊत यांनी रागाने का पाहतो व शिवीगाळ करू नको असे म्हणालेने बबलू कदम याने फिर्यादी राऊत यांच्या डोक्यात तलवारीने वार केला व ठार मारण्याचा प्रयत्न केला.

बबलू कदम याच्यावर बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोरे करीत आहेत.

Related Articles

Back to top button